एक्स्प्लोर

ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनचा जगभर डंका, तेजस ठाकरेंसह टीमचं काम फोर्ब्स मासिकात झळकलं

Tejas Thackeray and Thackeray wild life Foundation : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने (Thackeray wild life Foundation) पालीच्या नव्या दोन प्रजातींचा शोध लावला होता.

Tejas Thackeray and Thackeray wild life Foundation : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) आणि ठाकरे वाईल्ड लाईफ फाउंडेशनने (Thackeray wild life Foundation) पालीच्या नव्या दोन प्रजातींचा शोध लावला होता. ठाकरे फाऊंडेशनच्या या शोधाची दखल फोर्ब्स मासिकाकडून घेण्यात आली आहे. पालींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध लावण्यात ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनने मिळवलेल्या यशाची जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने दखल घेतली आहे. गोल बुबुळे असलेल्या पालींचा शोध अत्यंत वैशिष्टयपूर्ण असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. तसेच 'निमास्पिस व्हॅनगॉगी' या प्रजातीच्या नामकरणाचेही विशेष कौतुक केले आहे.

पालीचे नाव 'निमास्पिस व्हॅनगॉगी'

जगभरातून 'नॅशनल जिओग्राफिक', 'हायपर ऍलर्जिक', 'मायामी हेराल्ड' आदी माध्यमांकडून ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनच्या Thackeray wild life Foundation) संशोधनाची दखल घेतली गेली आहे. याच दरम्यान 'पर्ज' मासिकाने संशोधनाची वाहवा केली आहे. ज्यावेळी पाल सापडली त्यावेळी पालीचा रंग नावाजलेले चित्रकार वॅन गॉग यांच्या 'द स्टारी नाईट' या चित्राशी मिळताजुळता दिसला. त्यावरून पालीचे नाव 'निमास्पिस व्हॅनगॉगी' असे ठेवण्याची कल्पना तेजस ठाकरे यांना पहिल्यांदा सुचली होती. या नामकरणाचे विशेष कौतुक 'फोर्ब्स' मासिकाने केले आहे. 

पालींच्या संशोधनावर देशविदेशातून अखंडितपणे कौतुकाचा वर्षाव

'अत्यंत वैशिष्टयपूर्ण' अशी दाद मिळालेल्या या संशोधनामध्ये तेजस ठाकरे (Thackeray wild life Foundation) यांच्यासह अक्षय खांडेकर आणि इशान अगरवाल यांनी सहभाग घेतला होता. नव्याने शोधलेल्या दोन्ही पालींचा समावेश निमास्पिस कुळात केला असून गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्टय आहे. त्यामुळेच पालींच्या संशोधनावर देशविदेशातून अखंडितपणे कौतुकाचा वर्षाव सुरू राहिला आहे.

गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे वैशिष्ट्य

ठाकरे वाईल्डलाईफ फाऊंडेशनकडून (Thackeray wild life Foundation) सुरू असलेल्या हिंदुस्थानी द्वीपकल्पामधील पालींच्या सर्वेक्षणादरम्यान या पाली प्रथमतः आढळल्या. गोल बुबुळे हे निमास्पिस कुळातील पालींचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.  रंग, आकार, मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलची रचना आणि जनुकीय संचाच्या वेगळेपण यावरून दोन्ही पाली कुळातील इतरांपासून आणि एकमेकांपासून वेगळया ठरतात. नव्याने शोध लागलेल्या दोन्ही पाली दिनचर आहेत. छोटे किटक हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Ranjeetsinha Naik-Nimbalkar on Madha Loksabha : मोहिते पाटलांनी भाजपला टोपी घातली, आता पीएम मोदी माळशीरसमध्ये सभा घेतील, रणजित निंबाळकरांची माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11 PM 20 January 2025Donald Trump oath Ceremony | अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्प पर्व, 47वे राष्ट्राध्यक्ष म्हणून घेतली शपथSpecial Report Akshay Shinde Case | अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलीस गोत्यातJalgoan Crime News : जळगावात 'सैराट', पूजा-मुकेशच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Fire : स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
स्कूल व्हॅनमध्ये एलपीजी गॅस भरताना आग, लातूरमध्ये दोन गाड्या जळून खाक, एक जण गंभीर जखमी 
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
शेतजमिनीचा निकाल देण्यासाठी 55 हजार रुपयाची लाच, लिपिकासह शिपाई लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस आजाराला हटवा, बिग बिंनी उचलला विडा; अमिताभ बच्चन ब्रँड ॲम्बेसिडर
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
उपमुख्यमंत्री नाराज होऊन कोणत्या गावाला गेले ते शोधा, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
अक्षय शिंदेच्या वडिलांनी घराच्या दुरुस्तीसाठी घेतले कर्ज; दारावर कर्जाची नोटीस, फायनान्सची रक्कम किती?
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
ABP माझा इम्पॅक्ट; अखेर 87 विद्यार्थ्यांना घरपोच जात प्रमाणपत्र; दणक्यानंतर महसूल प्रशासन गदागदा हललं
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
पंढरीच्या गर्दीचं नियोजन अन् नियंत्रणासाठी AI तंत्रज्ञानचा वापर; कोट्यवधी रुपयांचा प्रस्ताव सादर
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
दोस्तीत कुस्ती... किरकोळ वादातून मित्रानेच केला मित्राचा खून; पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू
Embed widget