एक्स्प्लोर
2 दिवसात 10 लाख स्मार्टफोनची विक्री, शाओमीचा विक्रम
शाओमीच्या रेड मी नोट 4 ला भारतात मोठा प्रतिसाद मिळाला. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये रेड मी नोट 4 हा सर्वात जास्त विकला गेलेला स्मार्टफोन आहे.
मुंबई : शाओमीला फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज या सेलचा मोठा फायदा झाला आहे. शाओमीने दोन दिवसातच 10 लाख स्मार्टफोनची विक्री केली आहे. हा आकडा अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सध्या सुरु असलेल्या सेलच्या काळातील आहे.
या दोन दिवसांमध्ये प्रत्येक मिनिटाला शाओमीच्या 300 फोनची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत शाओमीच्या फोनची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे. गेल्या वर्षी 10 लाख फोनची विक्री होण्यासाठी 18 दिवस लागले होते. यावेळी दोनच दिवसात 10 लाख फोनची विक्री झाली.
शाओमीच्या रेड मी नोट 4 ला भारतात मोठा प्रतिसाद मिळाला. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये रेड मी नोट 4 हा सर्वात जास्त विकला गेलेला स्मार्टफोन आहे. या सेलमध्ये रेड मी नोट 4 हा स्मार्टफोनमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
शाओमी रेड मी नोट 4 हा फोन नुकताच लाँच करण्यात आला आहे. या फोनवर 2 हजार रुपये डिस्काऊंट देण्यात येत होता. या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement