एक्स्प्लोर

प्रतीक्षा संपली, रेडमी नोट 7 आणि रेडमी नोट 7 प्रो भारतात लॉन्च

'रेडमी नोट 7' ची विक्री 6 मार्चपासून होणार असून 'रेडमी नोट 7 प्रो'ची विक्री 13 मार्चपासून सुरु होईल. ग्राहकांना शाओमीच्या वेबसाईटसह फ्लिपकार्टवरही हा फोन खरेदी करता येणार आहे.

मुंबई : अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली बहुप्रतीक्षित रेडमी नोट 7 सीरिज शाओमीने भारतात लॉन्च केली आहे. कंपनीने रेडमी नोट 7 (Redmi Note 7) आणि रेडमी नोट 7 प्रो (Redmi Note 7 Pro) भारतात लॉन्च केला आहे. 'रेडमी नोट 7'  9,999 रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तर 'रेडमी नोट 7 प्रो'ची किंमत 13,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. 'रेडमी नोट 7' ची विक्री 6 मार्चपासून होणार असून 'रेडमी नोट 7 प्रो'ची विक्री 13 मार्चपासून सुरु होईल. ग्राहकांना शाओमीच्या वेबसाईटसह फ्लिपकार्टवरही हा फोन खरेदी करता येणार आहे. Redmi Note 7 हा भारतात 3GB रॅम, 32GB स्टोअरेज (9,999 रुपये) आणि 4GB रॅम, 64GB स्टोअरेज (11,999 रुपये) या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. अशाचप्रकारे Redmi Note 7 Pro देखील 4GB, रॅम, 64GB स्टोअरेज (13,999 रुपये) आणि 6GB रॅम, 128GB स्टोअरेज (16,999 रुपये) या दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला आहे. 'रेडमी नोट 7' सीरिजसोबतच कंपनीने Mi LED TV 4A Pro 80cm (32) ही लॉन्च केला आहे. याची किंमत 12,999 रुपये निश्चित करण्यात आली आहे. रेडमी नोट 7 चे (Redmi Note 7) स्पेसिफिकेशन्स नव्या 'रेडमी नोट 7' चं डिझाईन बदलण्यात आलं आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच आणि नवी ग्रेडिएंट फिनिशिंग देण्यात आली आहे. हा पहिला रेडमी नोट आहे, ज्यात छोटा नॉच आणि आत सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. बॅक पॅनल : रेडमी नोट 7 च्या बॅक पॅनलमध्ये ग्रेडिएंट फिनिशिंग देण्यात आली आहे. रंग : गुलाबी, काळा, निळ्या रंगात उपलब्ध कॅमेरा : 12 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, पोर्ट्रेट शॉट्स क्लिक करण्यासाठी 2 मेगापिक्सेलचा दुसरा कॅमेरा, 13 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा. एआय फेस अनलॉक, एआय स्मार्ट ब्युटी आणि एआय सिंगल शॉट ब्लर फीचर. लो लाईट फोटोग्राफीसाठी नाईट मोड रिझॉल्यूशन : 1080X2340 डिस्प्ले : 6.30 इंच फूल एचडी प्लस एलटीपीए, कॉर्निंग गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन रॅम : 6GB पर्यंत रॅम स्टोअरेज : 64GB पर्यंत स्टोअरेज प्रोसेसर : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर बॅटरी : 4,000mAh, क्विक चार्ज 4 सपोर्ट रेडमी नोट 7 प्रोचे (Redmi Note 7 Pro) स्पेसिफिकेशन्स 'रेडमी नोट 7 प्रो' देखील दिसायला जवळपास 'रेडमी नोट 7' सारखाच आहे. म्हणजेच 'रेडमी नोट 7 प्रो'मध्येही ग्रेडिएंट फिनिशिंग, फंकी कलर्स आणि वॉटरड्रॉप नॉच मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या रिअरमध्येही दोन कॅमेरे आणि फ्रंटला एक कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेरा : रिअरमध्ये f/1.8 अपार्चरसोबत 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि पोर्ट्रेट शॉट्स क्लिक करण्यासाठी 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 13 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच फेस अनलॉकचाही ऑप्शन दिला आहे. तर लो-लाईट फोटोग्राफीसाठी नाईट-मोड मिळेल. रिझॉल्यूशन : 1080x2340 डिस्प्ले : 6.3 इंच फूल एचडी प्लस एलटीपीएस, स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5, प्रोसेसर : क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर रॅम : 6GB स्टोअरेज : 128GB बॅटरी : 4,000mAh, क्विक चार्ज 4 सपोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
Embed widget