एक्स्प्लोर

ट्विटरवर ब्लू टिक मिरवायचीये तर पैसे मोजा! एलन मस्क दरमहा शुल्क आकारणार?

Twitter Verification Process : रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटर आपली पडताळणी प्रक्रिया बदलणार आहे. ब्लू टीक वापरकर्त्यांना 4.99 ते 19.99 डॉलर प्रति महिना शुल्क आकारू शकते.

Twitter Verification Process : सध्या संपूर्ण जगभरात ट्विटरची (Twitter News) चर्चा आहे. आता ट्विटरची मालकी एलन मस्क (Elon Musk) यांच्याकडे गेली आहे. मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यापासूनच बदलांच्या नांदीचे संकेत दिले होते. त्यानुसार, लवकरच ट्विटरमध्ये अनेक बदल घडणार आहेत. यातील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, ट्विटर युजर व्हेरिफिकेशन प्रक्रियेत बदल होणार आहे. एलन मस्क (Elon Musk) यांनी रविवारी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "संपूर्ण व्हेरिफिकेशन प्रक्रिया सध्या सुधारित केली जात आहे." मात्र, या संदर्भात त्यांनी अद्याप सविस्तर माहिती दिलेली नाही.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, ट्विटर युजर्सचं (Platformer) खातं व्हेरिफाइड करण्यासाठी आणि ब्लू टिक देण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. अहवालानुसार, ट्विटर वापरकर्त्यांना ब्लू टिक टिकवून ठेवण्यासाठी म्हणजेच, त्यांचं अकाउंट व्हेरिफाईड करण्यासाठी 4.99 डॉलर्स म्हणजेच, सुमारे 415 रुपये प्रति महिना भरावे लागण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, सध्या चीफ ट्वीट (Chief Twit) एलन मस्क यांनी यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. कदाचित मस्क व्हेरिफाईड अकाउंट्ससाठी कोणतंही शुल्क न आकारण्याचाही निर्णय घेऊ शकतात. 

ट्विटरवर ब्लू टिक मिरवायचीये तर पैसे मोजा! एलन मस्क दरमहा शुल्क आकारणार?

द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, ट्विटर ब्लूसाठी सबस्क्रिप्शन शुल्क वाढवू शकतं. यामार्फतच युजर व्हेरिफिकेशन केलं जाऊ शकतं. द वर्जनं अंतर्गत पत्रव्यवहारामार्फत सांगितलं की, शुल्क 4.99 डॉलर्स ते 19.99 डॉलर्स प्रति महिना असू शकतं.

Twitter Blue गेल्या वर्षी जूनमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं. ट्विटर ब्लू युजर्सना विशेष मासिक सदस्यत्व तसेच त्यांचं ट्वीट एडिट करण्याचंही फिचर मिळतं. दरम्यान, एलन मस्क यांनी एप्रिलमध्ये एक पोल घेतला होता. या पोलमार्फत ट्वीट एडिट करण्याचं फिचर मिळालं पाहिजे की, नाही? यासंदर्भात त्यांनी युजर्सचं मत जाणून घेतलं पाहिजे होतं. या पोलमध्ये तब्बल 70 टक्के लोकांनी ट्वीट एडिट फिचर मिळणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं. यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला काही युजर्सना ट्वीट एडिट करण्याचं फिचर देण्यात आलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Edit Tweet Button : आता ट्वीट करा एडिट, एलॉन मस्क यांची भारतीयांना भेट

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget