(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Realme Nazo 30 4G आणि 5G फोन भारतात कधी लॉन्च होणार? काय आहेत फीचर्स?
Realme Nazo 30 4G आणि Realme Nazo 30 5G फोनमधील फक्त प्रोसेसरमध्ये फक्त फरक आहे. यात 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे.
Tech News : मिड-रेंज स्मार्टफोनसाठी लोकप्रिय कंपनी Realme आपला Narzo सीरिजचा 5 जी फोन भारतात बाजारात आणणार आहे. कंपनी आपल्या लॉन्च इव्हेंटमध्ये Realme Nazo 30 4G आणि Realme Nazo 30 5G दोन्ही स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. हा कार्यक्रम 24 जून रोजी दुपारी व्हर्चअली असणार आहे. कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलव्यतिरिक्त आपण हा कार्यक्रम इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. हा फोन सर्वात स्वस्त 5 जी फोन असेल असा दावा केला जात आहे. जाणून घेऊयात फोनच्या फीचर्सबद्दल.
Realme Nazo 30 4G आणि Realme Nazo 30 5G चे स्पेसिफिकेशन्स
Realme Nazo 30 4G आणि Realme Nazo 30 5G फोनमधील फक्त प्रोसेसरमध्ये फक्त फरक आहे. यात 6.5 इंचाचा फुल एचडी + डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 11 बेस्ड रियलमी यूआय 2.0 वर कार्य करतो. मीडियाटेक हेलियो जी 95 प्रोसेसरचा वापर त्याच्या 4 जी मॉडेलमध्ये करण्यात आला आहे, तर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर फोनच्या 5 जी व्हर्जनमध्ये वापरण्यात आला आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
असा असेल कॅमेरा?
Realme Nazo 30 4G आणि Realme Nazo 30 5G मधील फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, ज्याचा प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेल असेल. येथे 2 मेगापिक्सलचा मारक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 4K 30 fps ला सपोर्ट करतो. यात सुपर नाईट स्केप, अल्ट्रा मोड, पॅनोरोमा, पोर्ट्रेट मोड, एआय सीन, टाइम लॅप्स फोटोग्राफी, एचडीआर, अल्ट्रा मायक्रो आणि बरेच उत्तम कॅमेरा फीचर्स आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी
5000 mAh बॅटरी Realme Nazo 30 4G मध्ये देण्यात आली आहे, जी 30 डब्ल्यू फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. त्याचबरोबर Realme Nazo 30 5G मॉडेलमध्ये 5000 एमएएच बॅटरी देखील देण्यात आली आहे, जी 18 डब्ल्यू फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस यासारखे वैशिष्ट्ये उपलब्ध असतील. हा फोन रेसिंग ब्लू आणि रेसिंग कलर पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
Sony Xperia Ace 2 शी असेल स्पर्धा
Realme Nazo 30 हा भारतात नुकतीच लॉन्च झालेल्या सोनी एक्सपेरिया ऐस 2 शी स्पर्धा करू शकते. सोनी एक्सपेरिया ऐस 2 हा बजेट फोन आहे, त्याची किंमत 14,800 रुपये आहे. या फोनमध्ये 5.5 इंचाचा एचडी + डिस्प्ले आहे, फोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक हेलियो पी 35 एसओसी प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन देखील वॉटर रेसिस्टंट आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. आपण स्टोरेज 1 टीबी पर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ड्युअल रीअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 13 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 8 एमपीचा कॅमेरा आहे. त्यामध्ये आपल्याला 4,500 एमएएच बॅटरी मिळेल, जी यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्ज करण्यास सपोर्ट करतो.