एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
व्हॉट्सअॅपच्या 'Delete For Everyone' फीचरबाबत नवी माहिती समोर
तुम्ही मेसेज डिलीट केला तरीही त्या मेसेजला कोट करत रिप्लाय केल्यानंतर तो मेसेज दिसत राहतो
नवी दिल्ली : व्हॉट्सअॅपचं 'Delete For Everyone' हे फीचर नोव्हेंबरमध्ये रोलआऊट करण्यात आलं होतं. मात्र या फीचरबाबत नवी माहिती समोर आली आहे. तुम्ही मेसेज डिलीट केला तरीही त्या मेसेजला कोट करत रिप्लाय केल्यानंतर तो मेसेज दिसत राहतो.
चुकीने एखादा मेसेज सेंड झाल्यास तो डिलीट करता यावा, यासाठी हे फीचर देण्यात आलं होतं. चुकीच्या व्यक्तीला मेसेज गेल्यानंतर सात मिनिटांच्या आत तो डिलीट करता येतो. अशा मेसेजच्या जागी डिलीटेड मेसेज असं दिसतं.
या फीचरबाबत समोर आलेल्या नव्या माहितीनुसार, तुम्ही डिलीट केलेला मेसेजही वाचला जाऊ शकतो. याचा सर्वात मोठा धोका ग्रुपमध्ये आहे. तुम्ही मेसेज डिलीट करण्यापूर्वी एखाद्या युझरने त्याला कोट करुन रिप्लाय दिलेला असेल तर तो दिसत राहिल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement