एक्स्प्लोर
कोहलीची सलमानवर मात, फेसबुकवर दुसऱ्या स्थानी विराजमान!
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून प्रशिक्षकासोबतच्या वादामुळे चर्चेत असलेला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचंच दिसतंय. कारण विराट कोहली हा फेसबुकवर सर्वाधिक फॉलो केला जाणारा दुसरा भारतीय ठरला आहे.
विराट कोहलीने फेसबुकवर अभिनेता सलमान खानला मागे टाकलं आहे. आता कोहलीच्या पुढे पहिल्या क्रमांकावर केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.
फेसबुकवर दुसरं स्थान गाठल्यानंतर कोहलीने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
कोहलीचे फेसबुकवर तब्बल 3 कोटी 57 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. तर सलमान खानच्या फॉलोअर्सची संख्या 3 कोटी 51 लाखांवर आहे.
दुसरीकडे पहिल्या क्रमांकावर असलेले पंतप्रधान मोदींचे 4 कोटी 22 फॉलोअर्स आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement