तुमच्या चेहऱ्याचा 'अधिकार' द्या आणि मिळवा तब्बल 1.5 कोटी रुपये; अमेरिकेच्या रोबोट निर्मिती करणाऱ्या कंपनीची भन्नाट ऑफर
अमेरिकेतील एका रोबोट तयार करणाऱ्या कंपनीला त्यांच्या रोबोटसाठी योग्य मानवी चेहरा हवा आहे. त्यासाठी ते तब्बल 1.5 कोटी रुपये देणार आहेत.
मुंबई : कोट्यधीश व्हायला कुणाला नाही आवडणार? इतकं पैसे कमवायचं म्हणजे काही खायचं काम नाही. पण केवळ तुमच्या चेहऱ्याचा अधिकार देऊन तुम्ही आता एका क्षणात कोट्यधीश होऊ शकता. अमेरिकेतल्या प्रोमोबोट (Promobot) या रोबोट निर्मिती करणाऱ्या कंपनीने ही भन्नाट ऑफर दिली आहे. हॉटेल, शॉपिंग मॉल्स आणि इतर सार्वजनिक ठिकाणी काम करणाऱ्या रोबोसाठी मानवी चेहरा हवा आहे, आणि त्यासाठी ही कंपनी तब्बल 1.5 कोटी रुपये देणार आहे.
या रोबोटसाठी एक चांगला आणि लोकांना भावणारा चेहरा हवा असल्याचं प्रोमोबोट या कंपनीने जाहीर केलं आहे. असा चेहरा मिळाल्यास ही कंपनी त्या व्यक्तीला 1.5 कोटी रुपये देणार आहे. त्या व्यक्तीचा चेहरा रोबोटसाठी वापरण्यात येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे हा चेहरा त्या रोबोटला कायमस्वरूपी लावण्यात येणार आहे.
हा असा मानवी चेहरा असलेला रोबोट 2023 पासून कार्यरत होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. अमेरिकेतल्या अनेक मॉल्स, हॉटेल्स आणि इतर मोठ्या दुकानांमध्ये हा रोबोट काम करत असल्याचं दिसून येणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी हा रोबोट काम करणार असल्याने त्याला एक चेहरा असणं गरजेचं असल्याचं कंपनीने म्हटलं आहे. जर रोबोटला मानवी चेहरा असेल तर त्याकडे लोक आकर्षित होतील. त्यामुळे ज्या लोकांची या रोबोटला आपला चेहरा द्यायची इच्छा असेल किंवा ज्या लोकांना त्यांच्या चेहऱ्याचे अधिकार द्यायची इच्छा असेल त्यांनी कंपनीच्या वेबसाईटला भेट द्यावी आणि रितसर अर्ज करावी असं कंपनीनं म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :