एक्स्प्लोर
टीव्हीएस व्हिक्टरच्या विक्रीचा रेकॉर्ड, दिवाळीनिमित्त खास डिस्काऊंट
मुंबई : टीव्हीएस मोटर कंपनीची प्रसिद्ध कम्युटर बाईक व्हिक्टर बाईकप्रेमींच्या पसंतीस उतरली आहे. 9 महिन्यांपूर्वी टीव्हीएस व्हिक्टर लॉन्च झाली. गेल्या 9 महिन्यात या बाईकने 1 लाखांहून अधिक यूनिट्सची विक्री झाली. 110 सीसीच्या या बाईकला बाजारात चांगली मागणी असल्याचे दिसते आहे.
टीव्हीएस व्हिक्टरच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीने प्रत्येक महिन्याला 10 हजार यूनिट बनवण्याचं ठरवलं आहे आणि तशी सुरुवातही केली आहे. या सेगमेंटमध्ये हिरोची पॅशन प्रो आणि स्प्लेंडर बाजारात आपली जागा भक्कम करुन आहेत. त्यात आता व्हिक्टरने या दोन्ही बाईकना स्पर्धा निर्माण केली आहे.
टीव्हीएस व्हिक्टरमुळे कंपनीने मार्केट शेअरमध्ये 8 टक्के वाढही मिळवली आहे. आता टीव्हीएस मोटर कंपनी या बाईकच्या माध्यमातून येत्या दोन वर्षात 10 ते 12 टक्के मार्केट शेअर मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
टीव्हीएस व्हिक्टरचे फीचर्स :
110 सीसी
3 वॉल्व्ह इकोथर्स्ट इंजिन
9.4 बीएचपी पॉवर
9.4Nm टॉर्क
5 स्पीड गिअरबॉक्स
प्रती लिटर 76 किमी प्रवास
हाजार्ड लाईट
सणासुदीला खास सवलत
एकीकडे टीव्हीएस व्हिक्टर बाईकप्रेमींच्या पसंतीस उतरत आहे. तर दुसरीकडे दिवाळी सणाचं निमित्त साधून टीव्हीएस मोटर कंपनीने टीव्हीस स्टार प्लस आणि टीव्हीएस स्पोर्ट या नव्या कलरचे पर्याय बाजारात उतरवले आहेत. याशिवाय, सणासुदीत आपल्या बाईकवर टीव्हीएस मोटर कंपनी वेगवेगळ्या ऑफरही जाहीर करत आहेत. टीव्हीएसच्या वेबसाईट्सवर या ऑफर पाहायला मिळतील.
टीव्हीएस व्हिक्टरची दिल्लीतील किंमत (किंमती शहरानुसारत बदलतील) :
1. टीव्हीएस व्हिक्टर (ड्रम ब्रेक) - 50,715 रुपये
2. टीव्हीएस व्हिक्टर (डिस्क ब्रेक) - 52,715 रुपये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement