एक्स्प्लोर
Advertisement
मोबाईल आणि आधार लिंक करताना या दहा गोष्टी लक्षात ठेवा
मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी वन टाईम पासवर्ड (ओटीपी) आणि घरबसल्या सिम व्हेरिफिकेशन सुविधा सरकारकडून दिली जाणार असल्याची माहिती आहे.
मुंबई : सिम कार्ड आधार नंबरने व्हेरिफाईड करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे. री-व्हेरीफेशनची प्रक्रिया सोपी केली जाणार असल्यामुळे तुम्हाला घरबसल्या सिम व्हेरिफाईड करता येईल.
मोबाईल क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी वन टाईम पासवर्ड (ओटीपी) आणि घरबसल्या सिम व्हेरिफिकेशन सुविधा सरकारकडून दिली जाणार असल्याची माहिती आहे. ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची याबद्दल काही माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे.
या दहा गोष्टी लक्षात ठेवा
- रि-व्हेरिफिकेशनसाठी 6 फेब्रुवारी 2018 ची डेडलाईन देण्यात आली आहे. यानंतर तुमचं सिम बंद होईल.
- 1 डिसेंबरपासून ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी ओटीपीची सुविधा दिली जाईल, अशी घोषणा युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटीने म्हणजेच आधार प्राधिकरणाने केली आहे. म्हणजेच तुम्ही मेसेज, आयव्हीआरएस कॉल किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून लिकिंग रिक्वेस्ट पाठवू शकता. त्यामुळे तुम्हाला बायोमेट्रिक न देताही रि-व्हेरिफिकेशन करता येईल.
- ही प्रक्रिया ऑनलाईन करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला मेसेजवर ऑनलाईन लिंक करण्यासाठी एखादी लिंक आली तर त्यावर क्लिक करु नका.
- तुमचा आधार नंबर आणि चालू मोबाईल नंबर असेल तरीही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल.
- आजारी व्यक्ती, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना ही प्रक्रिया पूर्ण करताना अडचण येऊ नये, किंवा त्यांच्या घरी जाऊन लिंकिंग करुन द्यावी, यासाठी दूरसंचार कंपन्यांना आदेश देण्यात आले आहेत.
- या ग्राहकांसाठी अशी व्यवस्था करावी लागेल, ज्यामुळे त्यांना कोणतीही अडचण न येता प्रक्रिया पूर्ण होईल.
- एजंटकडून रि-व्हेरिफिकेशन केलं तर त्याला संपूर्ण ई-केवायसीची माहिती मिळू नये, याची काळजी घेण्याची जबाबदारी दूरसंचार कंपनीची असेल.
- आधार आणि मोबाईल लिंकिंग मोफत असेल, तुम्हाला यासाठी पैसे देण्याची गरज नाही.
- एकापेक्षा जास्त मोबाईल कनेक्शन असणाऱ्या व्यक्तींना वेगवेगळं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करावं लागेल.
- बनावट ओळखपत्र देऊन सिम खरेदी केलेल्या ग्राहकांना पकडण्यासाठी केंद्र सरकारने ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बातम्या
निवडणूक
निवडणूक
Advertisement