एक्स्प्लोर
Pokemon Go खेळताना 18 वर्षीय मुलाचा मृत्यू
ग्वाटेमाला सिटी : काही दिवसांपूर्वीच लाँच झालेला 'Pokemon Go' या मोबाइल गेमनं तरुणाईला अक्षरश: वेड लावलं आहे. पण आता या गेममुळे एका 18 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
लॅटिन अमेरिकेतील ग्वाटेमाला देशात ही घटना घडली
Pokemon Go गेममुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. The Independent च्या वृत्तानुसार, 18 वर्षीय जरसन लोपेज यांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. तो आपल्या भावासोबत Pokemon Go गेम खेळत होता. हे दोघेही ग्वाटेमाला सिटीच्या रस्त्यावर Pokemon च्या शोधात होते.
जरसन आणि डेनियल हे दोघेही Pokemon Go खेळता खेळता एका घरात घुसले. त्याचवेळी त्यांच्यावर एका अज्ञातानं गोळ्या झाडल्या. गोळी जरसनला लागल्यानं त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना घटनास्थळावरुन 20 गोळ्या सापडल्या आहेत. मात्र, जरसनच्या हत्येचं कारण समजू शकलेलं नाही.
दरम्यान, ज्या देशांमध्ये Pokemon Go गेम लाँच करण्यात आला आहे. त्या देशामध्ये गेम खेळताना अनेकांकडून नियमाचं उल्लंघन होताना दिसून येत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement