एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इनकम टॅक्स रिटर्नस फाइल करण्यासाठी नवे अॅप
नवी दिल्ली: स्टार्टअप एंजलने आयकर दात्यांना आपले इनकम टॅक्स भरण्याचा सहज सोपा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. आयकर विभागाने इनकम टॅक्स रिटर्नस फाईल करण्यासाठी नवे 'हॅलो टॅक्स' हे नवे मोबाईल अॅप लाँच केले आहे.
या अॅपमुळे फक्त चारच मिनिटांत तुम्हाला तुमचे आयकर रिटर्नस भरता येणार आहेत. हे नवे अॅप मोबाईल अॅप स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले असून, याचे ब्राउजर आणि विंडोजचे व्हर्जनही लाँच करण्यात आले आहे. या अॅपद्वारे तुम्हाला तुमचे इनकम टॅक्स रिटर्नस फाईल करण्यासाठी 125 रुपये खर्च करावे लागणार आहेत.
या अॅपमध्ये कोणत्याही प्रकारे वैयक्तीक माहिती घेतली जात नसून, त्यामुळे तुम्हाला तुमचे टॅक्स रिटर्नस सहज भरता येणार आहेत.
'हॅलो टॅक्स' या अॅपचे सह संस्थापक हिंमाशु कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अॅपच्या सहाय्याने तीन टप्प्यात तुम्हाला तुमचे टॅक्स रिटर्नस भरता येणार आहेत. तुमच्या टॅक्सशी संबंधीत सर्व माहिती ऑनलाईन ठेवण्यासाठी हॅलो टॅक्स ड्राइव्हदेखील सुरु करण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement