एक्स्प्लोर
भारतात 4 एप्रिलला Moto G5 स्मार्टफोनचं लाँचिंग
मुंबई: मोटोरोला आपला नवा स्मार्टफोन G5 भारतात 4 एप्रिलला लाँच करणार आहे. कंपनीनं या स्मार्टफोनच्या लाँचिंगसाठी मीडियाला निमंत्रणंही धाडली आहेत.
याच महिन्यात कंपनीने G5 प्लस लाँच केला होता. पण तेव्हा त्यांनी आपला G5 डिव्हाइस लाँच केला नव्हता. पण आता कंपनीनं हा स्मार्टफोन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे.
G5च्या 2GB RAM/16GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 199 युरो (जवळजवळ 14,000 रु.) आहे. पण भारतात याची किंमत किती असणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
मोटोरोला G5 स्मार्टफोनचे खास फीचर्स:
या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर असणार आहे. होम बटनमध्ये इंटिग्रेटेड असणार आहे.
हा स्मार्टफोन अँड्रॉईड 7.0 नॉगट ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित
मोटो G5 मध्ये 5 इंच स्क्रिन आणि 1080x1920 रेझ्युलेशन
1.4GHz स्नॅपड्रॅगन 430 प्रोसेसर आहे, मोटो G5 2/3 जीबी रॅम व्हेरिएंट आहे. या डिव्हाइसची इंटरनल मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.
13 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे.
यामध्ये 2800 mAh बॅटरी असणार आहे.
संबंधित बातम्या:
शाओमीचा मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Mi6चं 11 एप्रिलला लाँचिंग
आयफोन 7 च्या 'रेड' लिमिटेड एडिशनचं आजपासून बुकिंग
Sony Xperia XZच्या किंमतीत भरघोस कपात, तब्बल 10 हजारांची सूट
'नोकिया 3310' च्या या मॉडेलची किंमत तब्बल 1,13,200 रुपये!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement