एक्स्प्लोर

Mobile Tariff Hike : मोबाइलवर बोलणं महागणार? टॅरीफमध्ये वाढ करण्याचे टेलिकॉम कंपन्यांचे संकेत

Mobile Tariff Hike : येत्या वर्षात मोबाइल फोनवर महागण्याची शक्यता असून एअरटेलच्या अधिकाऱ्यांनी तसे संकेत दिले आहेत.

Airtel Mobile Tariff:  यंदाच्या वर्षात आता मोबाइल फोनवर बोलणं आणखी महागण्याची शक्यता आहे. फोन कॉल आणि इतर सेवांमध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत एअरटेलच्या अधिकाऱ्याने दिले आहेत. सरासरी प्रति ग्राहक महसूल हा 200 रुपयांपर्यंत नेण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. नोव्हेंबर 2021 मध्ये एअरटेलने मोबाइल आणि सेवांच्या दरात 18 ते 25 टक्क्यांनी वाढ केली होती. 

भारती एअरटेलचे भारत आणि दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गोपाल विट्टल यांनी सांगितले की, “मला वाटतं की 2022 मध्ये मोबाइल सेवांचे दर वाढू शकतात. मात्र, येत्या तीन-चार महिन्यांत असे होणार नाही. मात्र, त्यानंतर दरवाढ होऊ शकते. पूर्वीप्रमाणेच या वेळीही आम्ही मोबाइल दरवाढीचा निर्णय घेण्यास पुढाकार घेऊ. 

डिसेंबर तिमाहीत भारती एअरटेलचा एकत्रित निव्वळ नफा 2.8 टक्क्यांनी घसरून 830 कोटी रुपयांवर आला आहे. या तिमाहीत कंपनीचे एकत्रित उत्पन्न 12.6 टक्क्यांनी वाढून 29,867 कोटी रुपये झाले आहे. विट्टल यांनी सांगितले की, आमचा प्रति ग्राहक महसूल 2022 मध्ये 200 रुपयांवर पोहचण्याची अपेक्षा आहे. त्याशिवाय येत्या काही वर्षात हे प्रमाण 300 रुपये गाठेल अशी आशा आहे. 

डिसेंबर 2021 च्या तिमाहीत भारतातील Airtel चे 4G ग्राहक वार्षिक 18.1 टक्क्यांनी वाढून 195 दशलक्ष झाले. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत ही संख्या 16.56 कोटी होती. भारतातील एअरटेलच्या नेटवर्कवरील प्रति ग्राहक डेटा वापर 16.37 गीगाबिट (GB) वरून 18.28 GB पर्यंत 11.7 टक्क्यांनी वाढला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
Ashish Shelar : एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया, शेलार म्हणाले, उदय सामंतांचा गैरसमज दूर करु
एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Embed widget