एक्स्प्लोर
Flipkart Mobile Bonanza : 'या' मोबाईल फोनवर मिळणार भरघोस सूट
या सेलदरम्यान अनेक कंपन्यांच्या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.
फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग वेबसाईटवर आजपासून Mobile Bonanza Sale ला सुरुवात होत आहे. या सेल दरम्यान अनेक स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात आली आहे. फ्लिपकार्टच्या अॅपवर या ऑफरची माहितीही देण्यात आली आहे. हा सेल 17 जून पासून 21 जून पर्यंत चालणार आहे.
या स्मार्टफोनच्या किंमतीवर मिळणार सूट :
Redmi 6 हा फोन या सेल दरम्यान 7,499 रुपयांना मिळणार आहे. या फोनची ओरिजनल किंमत 8,999 आहे.
Realme 3 हा फोन सेल दरम्यान 8,999 रुपयांना मिळणार आहे.
Honor 7s हा 8,999 रुपये किंमतीचा फोन 5,499 रुपयांना मिळणार आहे.
Asus Max Pro M1 हा 12,999 रुपयांचा फोन 8,499 रुपयांना मिळणार आहे.
Samsung Galaxy J6 हा फोन 9,490 रुपयांना मिळणार आहे.
Redmi Note 6 Pro हा स्मार्टफोन आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत या सेलमध्ये मिळणार आहे. 13,999 रुपयांना हा फोन मिळणार आहे.
Honor 9i हा फोन 8,999 रुपयांना मिळणार आहे.
अॅपलच्या iPhone च्या किंमतीवरही मोठी सूट देण्यात आलेली आहे. iPhone X या सेलदरम्यान 66,499 रुपयांना मिळणार आहे.
या फोन्ससोबतच अॅपल, नोकिया, रेडमी, रिअलमी, सॅमसंग, हॉनर, विवो, ओपो, मोटो, लिनोवो या कंपन्यांचा इतरही स्मार्टफोनवर चांगली सूट देण्यात आलेली आहे.
या सेल दरम्यान खरेदीनंतर अॅक्सिस बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास त्यावर 10 टक्के अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच इएमआय द्वारे करण्यात येणाऱ्या व्यवहारांवर देखील 250 रुपये सूट देण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement