एक्स्प्लोर

मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं निधन, अॅलन यांची संपत्ती....

“पॉल यांनी आमची कंपनी, इंडस्ट्री आणि समाजासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे” असं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे.

मुंबई: जगातील बलाढ्य सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक पॉल अॅलन यांचं निधन झालं. ते 65 वर्षांचे होते. 70 च्या दशकात बिल गेट्स यांच्यासोबत त्यांनी मायक्रोसॉफ्टचा पाया घातला होता. कॅन्सरने त्रस्त असलेल्या पॉल यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. पॉल यांनी दोन आठवड्यापूर्वीच आपल्याला कॅन्सरने घेरल्याचं सार्वजनिकरित्या सांगितलं होतं. 9 वर्षांपूर्वीही त्यांच्यावर उपचार झाले होते. मात्र कॅन्सरने पुन्हा उभारी घेतल्याने पॉल यांची प्रकृती बिघडली होती. दरम्यान, पॉल अॅलन यांच्या निधनामुळे मायक्रोसॉफ्टने आपला शोकसंदेश जारी केला. “पॉल यांनी आमची कंपनी, इंडस्ट्री आणि समाजासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे” असं मायक्रोसॉफ्टने म्हटलं आहे. मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ सत्या नडेला यांनीही शोक व्यक्त करताना, पॉल यांनी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक म्हणून केलेलं काम मोठं आहे. त्यांनी नवनवे प्रोडक्ट आणले, त्यांच्या अनुभवाने संस्था मोठी झाली, त्याचवेळी त्यांनी जगालाही बदललं, असं म्हटलं. पॉल अॅलन यांची संपत्ती तरुण वयापासूनच मोठं संशोधन करणारे पॉल अॅलन यांच्या संपत्तीचा पसारा मोठा आहे. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, पॉल यांची संपत्ती 20.3 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 149 अब्ज रुपये इतकी आहे. मायक्रोसॉफ्टची स्थापना पॉल अॅलन आणि बिल गेट्स हे दोघेही लहानपणापासूनचे मित्र. या बालमित्रांची आवडही सारखीच होती. दोघांनाही कॉम्प्युटर, तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअरबाबत आकर्षण होतं. त्यातूनच दोघांनी मिळून 1975 मध्ये मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली. त्यावेळी पॉल हे 22 वर्षांचे तर बिल गेट्स अवघ्या 19 वर्षांचे होते. मायक्रोसॉफ्टसाठी 1980 हे वर्ष लाखमोलाचं ठरलं. कारण आयबीएम कॉर्पने पर्सनल कॉम्प्युटर (पीसी) क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी आयबीएमने मायक्रोसॉफ्टला पीसीसाठी ऑपरेटिंग सिस्टिम पुरवण्यास सांगितलं. या निर्णयामुळे मायक्रोसॉफ्ट हे तंत्रज्ञानाच्या बाबतीत जगभरात अव्वल ठरलं. मायक्रोसॉफ्टचे दोन्ही संस्थापक हे अल्पावधीत अरबपती झाले. मात्र पैसा मिळवणं हे काही एकमेव ध्येय दोघांचंही नव्हतं. या दोघांनी नंतर मोठं समाजकार्य केलं. पॉल अॅलन यांनी बेघर, अनाथांना मदत केली. शिवाय त्यांनी गेल्या काही दशकांपासून संशोधन क्षेत्रासाठी 2 अब्ज डॉलरपेक्षा जास्त पैशाचा पुरवठा केला आहे. पॉल अॅलन यांनी 1983 मध्ये मायक्रोसॉफ्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Mobile phone prices Rise: सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
सणासुदीला मोबाईल फोन घेण्याचा प्लॅन करणाऱ्यांना मोठा धक्का; स्मार्ट फोनच्या किंमतीत वाढ, ग्राहकांनी फिरवली पाठ
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
यंदाच्या दिवाळीत तुमचा आनंद द्विगुणित करा, हे 6 कडक क्वालिटीचे साऊंड बार विकत घ्या, घरातच थिएटरचा फिल घ्या
boAt Aavante Bar Prime Soniq-D Review: 240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार, boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
240W डॉल्बी ऑडिओ, इक्विकोर ड्राइव्हर्ससह 2.1-चॅनेल साउंडबार; boAt Aavante Bar Prime SoniQ-D ची खास वैशिष्ट्य, वाचा सविस्तर
AI Application: ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख
ना कोडिंगचं ज्ञान, ना एआयचं प्रशिक्षण..; 13 वर्षीय मुलीची भन्नाट कामगिरी, एआय ॲपची जगात चर्चा; तीन दिवसात कमावले 2.2 लाख

व्हिडीओ

Sanjay Raut PC Thane Purnekar Case : देवेंद्र फडणवीस...ठाण्यात फिरा मग कळेल, आक्रमक संजय राऊत UNCUT
Pradeep Purnekar Case : ठाकरेंच्या सैनिकावर फैरी पूर्णेकरांचे कोण वैरी? Special Report
India Alliance on EC : ज्ञानेश कुमारांना घेरलं इंडिया आघाडीचं ठरलं | Special Report ABP Majha
Thackeray Congress on EC : आयोगाविरोधात थोपटले दंड, विरोधकांची तयारी प्रचंड | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case : टॅटू, चॅटिंग, मर्डर; आरोपांचा डोंगर | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Drought : आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
आणखी 19 तालुक्यांत दुष्काळाचे सावट, मंत्रिमंडळ उपसमितीचे तातडीने सर्व्हेचे आदेश; 'हे' नियम लागू
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
सातारा पोलिसांकडून कासव तस्करीचा पर्दाफाश; 2 अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक, इंडीयन सॉफटसेल टर्टल जप्त
Water Link Tunnel : मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
मुंबई-पुणे मिसिंग लिंकला समांतर आता 'वॉटर लिंक'! कोकणातील पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळवणार; किसान आर्मीचा मोठा प्रस्ताव
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
रायगड समुद्रकिनारी बुडालेले 8 विद्यार्थी आळंदीचे रहिवाशी; पोलिसांकडून नावे समोर, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
मोठी बातमी ! रायगडच्या समुद्रकिनारी 8 जणांचा बुडून मृत्यू; पुण्यातील सहल फिरायला आल्याची माहिती
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
सकाळी बजरंग सोनवणेंकडून गंभीर आरोप, संध्याकाळी धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटले, दुष्काळाचं कारण
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
धक्कादायक! वडिलांनीच सख्ख्या मुलीला संपवलं, साताऱ्याच्या हद्दीत टाकून दिलं; अखेर 15 दिवसांनी हत्येचा उलगडा
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
पक्षप्रवेश होताच काँग्रेसचा पहिला उमेदवार जाहीर; विधानपरिषदेसाठी शिक्षक मतदारसंघातून अदिती पोहरेंना उमेदवारी
Embed widget