एक्स्प्लोर
मारुती सुझुकीच्या नवी डिझायर ग्राहकांच्या भेटीला, पाहा किंमत

मुंबई: मारुती सुझुकीची सर्वात चर्चेत असणारी डिझायर कार आता रस्त्यावर धावताना पाहायला मिळते आहे. सुरतमध्ये ही कार पाहायला मिळाली आहे. पेट्रोल व्हर्जन कारची किंमत 5.45 लाखापासून ते 8.41 लाखापर्यंत आहे. तर डिझेल व्हर्जनची कार 6.45 लाखापासून 9.41 लाखापर्यंत आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आतापर्यंत 33 हजार डिझायर कार बुक झाल्या आहेत. मंगळवार पासून कंपनीनं याची डिलिव्हरी सुरु केली आहे. नवी कार पेट्रोल आणि डिझेल व्हर्जनमध्ये उपलब्ध असणार आहे. तसेच ग्राहकांसाठी 6 रंगात आणि चार व्हेरिएंटमध्ये ही कार असणार आहे. डिझायरला बाजारात बरीच पसंती असल्याचा कंपनीचा दावा आहे. त्यामुळे आता ही कार ह्युंदाईच्या एक्सेंट, टाटाची टिगोरला टक्कर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
निवडणूक
महाराष्ट्र























