एक्स्प्लोर
हॅकर्सपासून वाचण्यासाठी मार्क झुकरबर्ग यांची अनोखी शक्कल!
मुंबई : जगातील सर्वात आघाडीची सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनी हॅकर्सपासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे. इन्स्टाग्रामवर 500 मिलियन फॉलोअर्स झाल्याच्या निमित्ताने एक फोटो मार्क झुकरबर्ग यांनी शेअर केला. मार्क झुकरबर्ग यांच्या हॅकर्सपासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल लढवल्याचं या फोटोमधून समोर आलं आहे.
इन्स्टाग्रामच्या सेलिब्रेशनसाठी शेअर केलेल्या या फोटोमध्ये मार्क यांच्या डेस्कवर एक मॅकबुक दिसत आहे. या मॅकबुकच्या वेबकॅम आणि मायक्रोफोनवर सेलोटेप चिटकवले आहेत. क्रिस ऑल्सन नावाच्या ट्विटर यूझरने या फोटोमधून मॅकबुकवर चिटकवलेली सेलोटेप पाहिली आणि तसा ट्वीटही केला.
https://twitter.com/topherolson/status/745294977064828929
Gizmodo ने आपल्या वृत्तात म्हटलं आहे की, हॅकर्स लॅपटॉपच्या कॅमेऱ्यामधून हॅकिंग करु शकतात. त्यामुळे कॅमेरा आणि मायक्रोफोनवर सेलोटेप लावून मार्क झुकरबर्ग यांनी हॅकर्सना आव्हान दिलं आहे.
The Next Web च्या वृत्तात म्हटलं आहे की, FBI संचालक जेम्स कोमी हॅकर्सपासून वाचण्यासाठी हीच पद्धत वापरतात. हॅकर्सपासून वाचण्यासाठी एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यापेक्षा हा मार्ग अत्यंत सोपा आहे.
मार्क झुकरर्ग सायबर क्रिमिनल्सच्या निशाण्यावरच आहेत. कारण याआधी त्यांचं ट्विटर आणि पिनटरेस्ट अकाऊंटही हॅकर करण्यात आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement