एक्स्प्लोर
तब्बल 4000mAh क्षमतेची बॅटरी, लेनोव्होचा नवा फोन लाँच
लेनोव्हो K8 प्लस 7 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनची किंमत 10 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.
नवी दिल्ली : लेनोव्होने भारतात K8 प्लस हा स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन 7 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. 12 वाजता फोनचा सेल सुरु होईल. लेनोव्हो K8 प्लसची किंमत 10 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे.
ड्युअल रिअर कॅमेरा आणि 4000mAh क्षमतेची बॅटरी ही या फोनची वैशिष्ट्य आहेत. या फोनच्या 13 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरामध्ये Purecel सेन्सर देण्यात आलं आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा फ्लॅशसह देण्यात आला आहे.
लाँचिंग ऑफर्स
लेनोव्हो K8 प्लस 10 हजार 999 रुपयांमध्ये उपलब्ध असेल. मात्र यासोबत अनेक ऑफर्सही देण्यात आल्या आहेत. 7 आणि 8 सप्टेंबर रोजी फ्लिपकार्ट फॅशनवर अतिरिक्त 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. तर 5 हजार रुपयांची बायबॅक गॅरंटी असेल. 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर आणि 399 रुपयांमध्ये जिओचा 30GB डेटा देण्यात येईल.
लेनोव्हो K8 प्लसचे फीचर्स :
- अँड्रॉईड नॉगट 7.1
- 5.2 इंच आकाराची स्क्रीन
- 13/5 मेगापिक्सेल ड्युअल रिअर कॅमेरा
- 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो P25 प्रोसेसर
- 3GB रॅम, 32GB स्टोरेज
- 4GB रॅम व्हेरिएंट लेनोव्हो K8 प्लस हॉलीडे नावाने उपलब्ध
- 4000mAh क्षमतेची बॅटरी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
Advertisement