एक्स्प्लोर
तब्बल 8 GB रॅमसह Le 2s लवकरच बाजारात, पहिला फोटो लीक
नवी दिल्लीः LeEco कंपनीचा नवा स्मार्टफोन लवकरच बाजारात येत आहे. या फोनचा नुकताच एक फोटो लीक झाला आहे. सप्टेंबरमध्ये हा फोन लाँच केला जाईल, असा अंदाज लावला जात आहे. Le 2s हे Le 2 फोनचं अपग्रेडेड व्हर्जन असणार आहे.
या फोटोमध्ये फोनचा लूक स्लीम आणि आकर्षक दिसत आहे. Le 2s च्या दुसऱ्या फोटोनुसार या फोनमध्ये अँटीना देण्यात आला असून बाजूला व्हॉल्यूम बटन आणि पॉवर बटन देण्यात आलं आहे.
Le 2s मध्ये 8 GB रॅम?
Le 2s चा लूक आयफोन 7 सारखा असण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये तब्बल 8 GB रॅम असणार आहे, असा दावा यापूर्वी लीक झालेल्या माहितीमध्ये करण्यात आला होता. हा फोन एवढी रॅम असणारा जगातील पहिलाच फोन असणार आहे. तसंच यामध्ये 64 GB इंटर्नल स्टोरेज असेल, असा अंदाज लावला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement