एक्स्प्लोर
लाव्हाचे दोन स्मार्टफोन लाँच, किंमत फक्त 2,999 रुपये

मुंबई: लाव्हाने आपले दोन नवे एन्ट्री लेव्हलचे स्मार्टफोन A68 आणि A32 लाँच केले आहेत. या स्मार्टफोनची किंमत 4,599 आणि 2,999 रुपये आहे. लाव्हाचा A68 गोल्ड आणि सिल्व्हर रंगाच्या वॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे. तर A32 ब्लॅक आणि व्हाईट वॅरिएंटमध्ये उपलब्ध आहे. लाव्हा A68 मध्ये 4.5 इंचाची स्क्रिन असून त्याची रिझॉल्यूशन कपॉसिटी 800x400पिक्सल आहे. तर या फोनला 1.2 GHz क्वार्डकोअर प्रोसेसर देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनला 1 जीबी रॅम तर 8 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. इंटरनल मेमरी 32 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनला 5 मेगापिक्सल रिअर तर फ्रंट कॅमेरा व्हीजीए आहे. या फोनला 1700mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. लाव्हा A32मध्ये ४ इंचचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 1GHzचा सिंगर कोर प्रोसेसर आणि 256MB रॅम 512 MB मेमरीच्या या स्मार्टफोनची इंटरनल मेमरी 32 GB पर्यंत वाढवता येऊ शकते. या फोनमध्ये 2 मेगापिक्सलचा रिअर तर फ्रंट कॅमेरा व्हीजीए देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनला 1500mAhचा बॅटरी बॅकअप देण्यात आलेला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 3G सपोर्टेड आहेत.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण























