एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
#कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र पुन्हा ट्विटरवर ट्रेण्ड
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील युती सरकारला सत्तेत येऊन नुकतेच दोन वर्षे पूर्ण झाले आहेत. 31 ऑक्टोबरला युती सरकारने दोन वर्षे पूर्ण केली. मात्र आज ट्विटरवर #कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र हा हॅशटॅग ऑल इंडिया ट्रेण्डिंग होत आहे.
भाजपने विधानसभा निवडणुकीपूर्वी, प्रचाराद्वारे तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कथित भ्रष्टाचारावर बोट ठेवलं होतं. त्यावेळी कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा या टॅगलाईनद्वारे भाजपची मोहिम सुरु होती.
मात्र आता दोन वर्षांनंतर जनताच फडवणीस सरकारला त्यांच्याच टॅगलाईनद्वारे जाब विचारत आहे. महाराष्ट्र सरकारने उद्योग, आरोग्य, शेती, शिक्षण, रस्ते आदींचा विकास कितपत केला, विविध समस्यांसाठी सरकारकडे उपाययोजना काय, असे प्रश्न #कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र या हॅशटॅगद्वारे विचारले जात आहेत.
काही ट्विटवर एक नजर
शेतकरी उपाशी गुन्हेगारी मधे वाढ#कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र
— #Devendra (@DevTheD) November 2, 2016
उद्धव जी प्रामाणिक IAS officer च्या बदलिसाठी CM ला भेटतात,तसे रस्ते,विज प्रश्नासाठी पण भेटा.नुसती युति करू नका. #कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र — V@!bh@V (@PhadVaibhav) November 2, 2016
दोन वर्षात मराठा समाजाच्या मागण्यांकडे दूर्लक्ष करून #कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र माझा ? @Dev_Fadnavis @CMOMaharashtra
— मराठा क्रांती मोर्चा (@RtMaratha) November 2, 2016
#कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र All ministers r just figure heads,real decisions r made by Rss pracharak known as "Baudhik". — Logical Indian (@IDIOTpathicDOC) November 2, 2016
संबंधित बातम्याआमच्या रस्त्यांची, पुलांची दयनीय अवस्था कधी संपणार?#कुठे_नेऊन_ठेवला_महाराष्ट्र
— Pranav Choudhari (@pranavchoudhari) November 2, 2016
अरे, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा, या जाहिराती बनवणारा पठ्ठ्या कोण?
व्हॉट्स अॅपवर भाजपच्या जाहिरातीवरून जोक्सवर जोक्स, 'कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र' ट्रेण्डिंगमध्ये
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement