एक्स्प्लोर

व्हायरल सत्य : तुमचा मोबाईल नंबर 1 जुलैपासून 13 अंकी होणार?

मोबाईल नंबर 10 ऐवजी 13 अंकी असेल असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : मोबाईल नंबर हा 13 अंकी होणार असल्याच्या सध्या सोशल मीडियावर अफवा आहेत. मोबाईल नंबर 10 ऐवजी 13 अंकी असेल असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र ही माहिती तोडून-मोडून पसरवली जात आहे. दूरसंचार विभागाने 8 जानेवारी 2018 रोजी एक बैठक घेतली होती. ज्यामध्ये M2M म्हणजे मशीन टू मशीन कम्युनिकेशनसाठी 13 अंकी नंबर लागू करण्यावर चर्चा झाली. M2M कम्युनिकेशन हा प्रकार व्यापाराशी संबंधित आहे. याचा आणि मोबाईल फोन नंबरचा काहीही संबंध नाही, अशी माहिती बीएसएनएलने दिली आहे. M2M कम्युनिकेशनसाठी 13 अंकी नंबर 1 जुलैपासून लागू करण्याबाबत चर्चा करण्यात आली. याचा मोबाईल नंबरवर काहीही परिणाम होणार नाही. सर्व दूरसंचार कंपन्यांना सिस्टम M2M कम्युनिकेशनसाठी 13 अंकी नंबरनुसार अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया पूर्ण करण्याचं काम ऑक्टोबर 2018 पासून सुरु होईल आणि अखेरची तारीख 13 डिसेंबर 2018 आहे. यासाठी LI (Lawful interception) सिस्टमही याच वेळेनुसार अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. Lawful interception च्या आधारावर तपास यंत्रणा गरज पडल्यास कोणताही संवाद ऐकू शकतात. M2M कम्युनिकेशन म्हणजे काय? M2M कम्युनिकेशनचा तुमच्या-आमच्या माबाईल वापराशी काहीही संबंध नसतो. ही एक व्यावसायिक सिस्टम आहे. व्यवसायासंबंधित कामकाजावर दूरुनच नियंत्रण ठेवण्यासाठी M2M कम्युनिकेशनचा वापर केला जातो. शिवाय इतर ठिकाणीही याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, रेल्वे स्टेशनवर तिकिटांसाठीची ऑटोमॅटिक मशीन असते, या मशीनमधील प्रिंटिंग पेपर संपला असेल तर M2M कम्युनिकेशनद्वारे तो पेपर टाकणाऱ्या व्यक्तीला सूचित केलं जातं. याशिवाय वेयर हाऊस मॅनेजमेंट, रिमोट कंट्रोल मॅनेजमेंट, रोबोटिक्स, ट्रॅफिक कंट्रोल, लॉजिस्टिक सर्व्हिस, सप्लाय चेन मॅनेजमेंटपासून ते टेलिमेडिसिनसारख्या सेवांसाठीही M2M कम्युनिकेशनचा वापर केला जातो. त्यामुळे तुमचा मोबाईल क्रमांक 10 अंकीच राहणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीमध्ये काहीही तथ्य नसल्याचं एबीपी माझाच्या पडताळणीत समोर आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe At Nana Patekar Funeral: पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
पहिले भावूक पोस्ट, मग तुकाराम मुंढे नाना पाटेकरांच्या अंत्यविधीला पोहोचले अन्..., नेमकं काय घडलं?, VIDEO
Nana Patekar Demise Tanushree Dutta Reaction Viral: 'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
'अहंकारी माणूस होता, देवानंच त्याचा जीव घेतलाय...'; नाना पाटेकरांच्या निधनानंतर Mee Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता बरळली, VIDEO
Accident In Kolhapur: भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
भरधाव कंटेनरची 3 दुचाकींना धडक; 6 जणांना उडवले, 4 जणांचा मृत्यू, कोल्हापुरमधील घटना
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
Embed widget