एक्स्प्लोर

31 मार्चनंतर जिओच्या सेवेसाठी किती पैसे मोजावे लागणार?

नवी दिल्ली : 31 मार्चनंतर जिओच्या युझर्सना मोफत सेवेसाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, जिओच्या नव्या प्लॅननुसार एप्रिल ते जून या महिन्यांदरम्यान मोफत सेवेसाठी अधिकचे 100 रुपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. रिलायन्स जिओचे यूझर्स सध्या मोफत सेवा मिळत आहे. यामध्ये यूझर्सना मोफत व्हॉईस कॉल आणि मोफत 4G डेटा मिळत आहे. याच महिन्यात रिलायन्स जिओ कंपनीने आपल्या वेलकम ऑफरची कालमर्यादा वाढवली. ‘हॅप्पी न्यू ईयर’ नाव दिलं आणि मार्च 2017 पर्यंत मोफत सेवेची ऑफर सुरु ठेवली आहे. आता या सर्व बाबतीत अपडेट अशी आहे की, रिलायन्स जिओ आता एका नव्या टेरिफ प्लॅनवर काम करत असून, देशातील सर्वात स्वस्त टेलिकॉम ऑपरेटर बनवणार आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ कंपनी नव्या टेरिफ प्लॅनवर अत्यंत वेगाने काम करत असून, आपल्या मोफत सेवेला अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची शक्यता आहे. नव्या प्लॅननुसार जिओ सेवेसाठी यूझर्सना 100 रुपये भरावे लागू शकतात. यासोबत एप्रिल ते जून महिन्यांदरम्यान यूझर्सना मोफत डेटा आणि मोफत कॉलसाठी 10 रुपये चार्ज करु शकते. टेलिकॉम रेग्युलेटर ‘ट्राय’ने भारताचे अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी मुकेश अंबानींच्या कंपनीकडून जिओच्या मोफत डेटा आणि मोफत कॉलिंग ऑफरवर स्पष्टीकरण मागवलं आहे. 90 दिवसांच्या वेलकम ऑफरनंतर ‘हॅप्पी न्यू ईयर’ ऑफरद्वारे मोफत कॉल आणि डेटा देण्याची घोषणा झाल्यानंतर ‘ट्राय’ने हे उचलले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम सेवा पुरवणारी रिलायन्स जिओ कंपनीने चार महिन्यात 7.24 कोटी ग्राहकांना जोडण्याचा विक्रम केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ग्राहकांच्या या संख्येत वेगाने वाढ होत आहे. सुरुवातीच्या दिवसात रिलायन्स जिओ कंपनी 6 लाख ग्राहक रोज जोडत होती. येत्या मार्च महिन्यापर्यंत जिओच्या ग्राहकांचा संख्या 10 कोटींच्या जवळपास आहे.

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल

व्हिडीओ

Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान
Manoj Jarange Maratha Reservation : मनोज जरांगेंसोबत चर्चेला ब्रेक आणि उद्रेक | Special Report ABP Majha
Amravati Tiger : वाघिणीचा मृत्यू, वनविभाग संशयाच्या जाळ्यात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
राधाकृष्ण विखे पाटलांचे बॅनर फाडले; मराठा आंदोलक आक्रमक, जरांगे पाटलांचाही सरकारला इशारा
Radha Patil Dance: कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
कोणताही डान्स करताना महिलांना कंबर हलवावीच लागते, त्यात अश्लील काय? राधा पाटीलचा टीकाकारांना संतप्त सवाल
Embed widget