एक्स्प्लोर
इंटेक्सचा एंट्री लेव्हल स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त 2,999 रुपये

मुंबई : भारतीय स्मार्टफोन कंपनी इंटेक्सने काही दिवसांपूर्वीच अॅक्वा क्लासिक स्मार्टफोन सीरीज लॉन्च केला होता. आता नवा एंट्री लेव्हल स्मार्टफोन अॅक्वा 3G प्रो Q स्मार्टफोन लॉन्च केला आहे, ज्याची किंमत फक्त 2 हजार 999 रुपये आहे. हा स्मार्टफोन कंपनीने वेबसाईटव खरेदीसाठी उपलब्ध केला आहे. अॅक्वा 3G प्रो स्मार्टफोनचं अपडेटेड व्हर्जन आहे. या स्मार्टफोनमध्ये 4 इंचाचा 480×800 पिक्सेल रिझॉल्युशन डिस्प्ले, 1.2GHz क्वार्ड कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. 512 एमबी रॅम, 4 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले असून, स्टोरेज वाढवण्याची सुविधाही उपलब्ध आहे. फिचर्समध्ये 2 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 0.3 पिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. 1300 mAh क्षमतेची बॅटरी असून, कनेक्टिव्हिटीमध्ये 3G, जी कॅमेरापीएस, ब्लूटूथ, वाय-फाय, यूएसबीसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
आणखी वाचा























