नवी दिल्ली: जगातील विविध देशांवर होणाऱ्या सायबर हल्ल्यांच्या बाबतीत आयबीएमने एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात आशिया-प्रशांत म्हणजेच इंडो- पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक सायबर हल्ले हे जपानवर झाले असून त्यानंतर भारताचा क्रमांक लागतोय असं सांगितलं आहे.
आयबीएमच्या सिक्युरिटी एक्स-फोर्सने सांगितलंय की गेल्या वर्षी कोरोनामुळे जगात बहुतांश ठिकाणी खाजगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करायला सांगितलं होतं. यामध्ये हॉस्पिटल, संशोधन, फार्मास्युटिकल, उर्जा तसेच अनेक आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा समावेश होतोय. या कंपन्याना सायबर हँकर्सनी मोठ्या प्रमाणावर लक्ष केल्याचं दिसून आलंय.
बेरोजगार तरुणांची सायबर क्रिमिनल्सकडून लूट, मोठ्या कंपन्यांचे ऑफर लेटर पाठवून फसवणूक
आयबीएमच्या या अहवालात सांगण्यात आलंय की गेल्या वर्षी इंडो-पॅसेफिक भागात सर्वाधिक सायबर हल्ले हे जपान या देशावर झाले आहेत. त्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. यातील जवळपास सात टक्के सायबर हल्ले हे भारतीय कंपन्यांवर करण्यात आले आहेत. आर्थिक क्षेत्रांशी संबंधित कंपन्या आणि विमा कंपन्यांवर 60 टक्के सायबर हल्ले झाले आहेत. त्यानंतर इतर सेवांचा क्रमांक लागतोय.
भारतावर होणारे सायबर हल्ले हे प्रामुख्याने पाकिस्तान आणि चीनमधील हॅकर्सकडून केले जातात असं समोर आलंय. कोरोना काळात वर्क फ्रॉम होममुळे या हॅकर्सना सायबर हल्ले करायला सोपं गेल्याचं समोर आलंय. गेल्या काही काळात अमेरिकेवरही मोठ्या प्रमाणात सायबर हल्ले झाल्याचं दिसून आलंय. हे सायबर हल्ले प्रामुख्याने रशिया आणि चीन या देशांतून करण्यात येत असल्याचं समोर आलंय.
कोरोनाच्या लस निर्मीती कंपन्यांच्या सर्व्हरवरही या काळात सायबर हल्ले झाल्याचं दिसून येतंय.
मुंबईत 12 ऑक्टोबरला खंडित झालेल्या वीजपुरवठा प्रकरणाचा तपास महाराष्ट्र सायबर सेल करणार