मुंबई : 12 ऑक्टोबरचा दिवस मुंबईच्या इतिहासात नेहमीच लक्षात राहील. 24 तास धावणाऱ्या मुंबईला 12 ऑक्टोबरला ब्रेक लागला. कारण वीज पुरवठा करणाऱ्या टाटा पॉवर सप्लायचा कळवा येथील ग्रीड फेलियर झाला होता. ज्यामुळे संपूर्ण एमएमआर रिजनचा विद्युत पुरवठा खंडित झाला. ज्यामुळे पूर्ण मुंबई अंधारात बुडाली होती. यापूर्वी असं कधीही झालं नव्हतं. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी यामागे सायबर हल्ला असण्याची शंका व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सायबर सेलने याचा तपास सुरू केला आहे.


विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर आधी तांत्रिक बिघाड असल्याचं सर्वांना वाटलं. मात्र, नितीन राऊत यांनी या पाठीशी सायबर हल्ल्याचा संशय व्यक्त केल्याने खळबळ निर्माण झाली आणि महाराष्ट्र सायबर सेल याच्या तपासाला लागलं आहे.


भारतात बहुतांश विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या या खाजगी आहेत आणि हे सर्व सिस्टम SCADA (supervisory control and data acquisition system) वर चालते. ज्याला हॅक करणं खूप अवघड आहे. मात्र, अशक्य नाही. याची उदाहरणसुद्धा पाहिली गेली आहेत. काही वर्षांपूर्वी रशियाने सुद्धा युक्रेनवर असाच पावर ग्रीड फेलियरचा हल्ला केला होता. द युक्रेन पूर्णपणे अंधारात छायेत गेला होता.


Mumbai Power Outage | मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित प्रकरणी चौकशी करणार : ऊर्जामंत्री नितीन राऊत


SCADA च्या टेक्निकल पद्धतीवर पॉवर सप्लाय चालतो. SCADA हे रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे ऑपरेट केलं जातं. याला हॅक करणे खूपच अवघड आहे. यासाठी तांत्रिक पद्धतीने सक्षम असलेला हॅकर लागतो. टेक्निकल आणि सायबर तज्ज्ञ अंकुर पुराणिक यांच्या मते SCADA ही सिस्टम हॅक करणं सोपं नाही ते अतिशय अवघड आहे. तसेच पॉवर सप्लाय सिस्टम हॅक करण्याआधी ती समजून घेणे खूपच गरजेचे आहे. अशा प्रकारच्या घटना जरी भूतकाळात घडल्या असल्या तरी टेक्नॉलॉजी आता अधिक पुढे गेलेली आहे. त्यामुळे ही सिस्टम हॅक करणं तितकं सोपं नाही. तसेच विद्युत पुरवठा करणाऱ्या कंपन्या वेळेसोबत आपल्या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा बदल करून अधिक सुरक्षितता बाळगतात.


अश्या प्रकारे ग्रीड फेलियर करून मोठ्या घातपाताची शक्यता असते जसे अति महत्त्वाचा डेटा चोरीला जाऊ शकतो आणि तो चोरी करत असताना कुठल्याही यंत्रणांना याचा सुगावा सुद्धा लागणार नाही. तसेच सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न सुद्धा निर्माण होऊ शकतो. कारण शहरातील सर्व सीसीटीव्ही, सिग्नल आणि इतर यंत्रणा यामुळे प्रभावित झालेल्या असतात. अशा प्रकारच्या घटना भविष्यात होऊ नये यासाठी यंत्रणा सज्ज झाल्याच आहेत पण, 12 ऑक्टोबर रोजी जो वीज पुरवठा खंडित झाला होता. त्याच्या मागे कोणाचं तरी षड्यंत्र नाही ना? याचाही तपास महाराष्ट्र सायबर सेलने सुरू केला आहे. लवकरचं सत्य काय ते समोर येईल.


 Mumbai Power Outage | वीज पुरवठा खंडीत होण्यामागे घातपाताची शक्यता : ऊर्जामंत्री नितीन राऊत