मुंबई : मारुती सुझुकी ग्राहकांसाठी लोकप्रिय मॉडेल स्विफ्टचं नवीन वर्जन लवकरच लॉन्च करणार आहे. मारुती सुझुकी स्विफ्टचं नवं मॉडेल नव्या फ्रंट डिझाइनसोबत बाजारात येणार आहे. याव्यतिरिक्त नव्या मॉडेलमध्ये अनेक आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे. नव्या मॉडेलमध्ये स्टार्ट-स्टॉप टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. त्याचसोबत नवा मल्टी-इन्फॉरमेशन डिस्प्लेही देण्यात आला आहे. मारुती सुझुकी स्विफ्टच्या नव्या फेसलिफ्ट वर्जनमध्ये क्रूज कंट्रोलची देखील सुविधा देण्यात आली आहे.


हे आहे स्विफ्टच्या नव्या मॉडेलची काही वैशिष्ट्ये :




  • मारुती सुझुकी स्विफ्टच्या नव्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये नेक्स्ट जनरेशनच्या सीरिजमध्ये 1.2 लीटर ड्युअल जेट वीवी इंजिन देण्यात आलं आहे.

  •  याव्यतिरिक्त इंजिन स्टार्ट-स्टॉप तंत्रज्ञानाचाही समावेश करण्यात आला आहे.

  • नव्या मॉडलचं मायलेजही चांगलं असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. जे 23.20 किलोमीटर प्रती लीटर असल्याचा दावा आहे.

  • नवं फिचर म्हणून क्रूज कंट्रोलचा समावेश करण्यात आला आहे.

  • त्याचसोबत मल्टी-इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टिम आणि की देण्यात आली आहे.

  • त्याचसोबत सिंक ऑटो फोल्डेबल ओआरवीएमही ग्राहकांना आकर्षित करेल.

  • याव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राममार्फत डोंगराळ भागांत हिल होल्ट असिस्टंटही सहभागी करण्यात आलं आहे.


दरम्यान मारुती सुझुकीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडल्समधील स्विफ्ट ही एक गाडी आहे. ग्राहकांना ही केवळ आकर्षकच करत नाही, तर आता नवं मॉडेलमध्ये मिळणाऱ्या फिचर्सनी याची उपयुक्तता आणखी वाढवली आहे. सर्वात खास गोष्ट म्हणजे, गाडीची किंमत. स्विफ्ट फेसलिफ्टच्या सुरुवातीच्या वर्जनमध्ये एलएक्सआयची किंमत 5.73 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. तसेच गाडीच्या टॉप मॉडेलची किंमत 8.41 लाख रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :