एक्स्प्लोर
4 जीबी रॅम, 64 जीबी मेमरी, हॉनरचा 6X लवकरच बाजारात
![4 जीबी रॅम, 64 जीबी मेमरी, हॉनरचा 6X लवकरच बाजारात Honor 6x Launching In India On January 24 4 जीबी रॅम, 64 जीबी मेमरी, हॉनरचा 6X लवकरच बाजारात](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/01/06191641/huawi1-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी हॉनर आपला नवीन स्मार्टफोन 6X जानेवारीत बाजारात उतरवणार आहे. हा फोन नुकताच लास वेगासमधील CES 2017 मध्ये लॉन्च करण्यात आला होता. भारतात हा स्मार्टफोन 24 जानेवारीला लॉन्च होणार आहे.
हॉनरच्या या स्मार्टफोनमध्ये कंपनीनं भरगच्च फिचर्स दिले आहेत. सर्व अद्ययावत फिचर्ससोबत हा फोन भारतीय स्मार्टफोन बाजारात सर्वांचच लक्ष वेधून घेणार आहे. CES 2017 मध्येही या स्मार्टफोनला मोठ्या प्रमाणावर पसंती देण्यात आली होती.
महत्त्वाची बाब म्हणजे या स्मार्टफोनमध्य़े ड्यूअल कॅमेरा देण्यात आला आहे. 32 जीबी व्हेरिएंटची किंमत जवळपास 20000 तर 64 जीबी व्हेरिएंटची किंमत जवळपास 17000 रुपये असेल.
हॉनर 6X चे फिचर्स :
ऑपरेटिंग सीस्टिम : अँड्रॉईड 6.0
डिस्प्ले : 5.5 इंचाची एचडी स्क्रीन, 1080X1920 रिझॉल्यूशन, 2.5D कर्व्हड ग्लास
रॅम : 3 जीबी/4 जीबी
मेमरी : 32 जीबी/ 64 जीबी
कॅमेरा : 12 मेगापिक्सेल आणि 2 मेगापिक्सेल ड्यूअल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट
बॅटरी : 3000mAh
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
शिक्षण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)