एक्स्प्लोर

फोर्ब्सच्या मते युट्यूबवर सर्वात जास्त कमाई करणारा 'हा' आहे नऊ वर्षाचा मुलगा

Highest paid YouTuber: रेयान काजी (Ryan Kaji) या नऊ वर्षाच्या मुलाने आपल्या युट्यूब व्हिडिओंच्या माध्यमातून तब्बल 220 कोटी रुपये कमावले आहेत. गेली कित्येक वर्षे तो अशा प्रकारची आर्थिक कमाई करत आहे.

Highest paid YouTuber: नऊ वर्षाचं वय तसंही खेळण्याचं असतं. पण इतक्या लहान वयातही काही मुलं आर्थिक कमाई करण्यास सुरु करतात. आता असाच एक नऊ वर्षाचा मुलगा या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा युट्यूबर आहे असं सांगितलं तर त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. पण हे खरं आहे. रेयान काजी या मुलाने वयाच्या सहाव्या वर्षापासून अशा प्रकारे पैसा कमवायला सुरुवात केली आहे. आणि या वर्षी त्यानं थोडं-थोडकं नाही तर तब्बल 200 कोटी रुपये कमावले आहेत.

फोर्ब्सने अशा लोकांची यादी प्रसिध्द केली आहे ज्यांनी युट्यूबच्या माध्यमातून सर्वाधिक कमाई केली आहे. यामध्ये  30 मिलियन डॉलर म्हणजे 220 कोटी रुपयांची कमाई करुन रेयान काजी प्रथम क्रमांकावर आहे. रेयान युट्यूबवर आपले व्हिडिओ अपलोड करतो आणि त्या माध्यमातून करोडो रुपये कमावतो.

गेल्या काही वर्षापासून रेयान आपले व्हिडिओ युट्यूबवर टाकतोय. त्याच्या या व्हिडिओंना युट्यूबवर प्रचंड प्रतिसाद मिळतो, त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो.

गेल्या वर्षी 180 कोटींची कमाई रेयान काजीने गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करुन जवळपास 26 मिलियन डॉलर म्हणजे 180 कोटी रुपये कमावले होते.

Ryan’s World रेयान काजीचे युट्यूबवर 'Ryan’s World' या नावाने एक चॅनेल आहे. यावर आतापर्यंत त्याने 1875 व्हिडिओ अपलोड केले आहेत. त्याला लोाकांचा मोठा प्रतिसाद मिळालाय. Ryan’s World या चॅनेलचे जवळपास 3 कोटी सबस्क्रायबर आहेत. त्याच्या व्हिडिओंना कोट्यवधी व्ह्यूज मिळतात. त्यामुळे त्याची कमाई इतकी प्रचंड आहे.

तीन वर्षाचा असताना पहिला व्हिडिओ रेयान टेक्सास मध्ये राहतोय. त्याने 2015 साली केवळ तीन वर्षाचा असताना पहिला व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केला होता. रेयान आता स्टोअर बिझनेसमधूनही आर्थिक कमाई करतोय. त्याने वॉलमार्टशी एक डील केली आहे. त्यामुळे त्याला आपले स्वत:चे उत्पादन विक्री करता येते.

खेळण्याच्या वस्तूच्या रिव्ह्यूचे व्हिडिओ रेयान तयार करतो. खेळण्यांचे अनबॉक्सिंग करणे आणि त्याच्याशी खेळणे अशा प्रकारच्या व्हिडिओंना अपलोड केलं जातं. युट्यूबच्या माध्यमातून कमाई करण्याच्या बाबतीत त्याचा गेली तीन-चार वर्षे फोर्ब्जच्या यादीत समावेश होतोय.

संबंधित बातम्या:'

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget