एक्स्प्लोर
Advertisement
मोबाईलचा नाद, 56 टक्के तरुण मनोरुग्ण, केईएममध्ये रुग्णांच्या रांगा!
मुंबई : मुंबईसह अन्य मोठ्य़ा शहरांमध्ये मोबाईलमुळे मानसिक आजारांचं प्रमाण वाढू लागलं आहे. इंटरनेट आणि स्मार्टफोनच्या वेडामुळे अनेकांना समुपदेशनाची गरज निर्माण होऊ लागली आहे. तसंच सेल्फीचं वेडंही आज तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर असल्याचं समोर आलंय.
मोबाईल अॅडिक्शनवर उपचार घेण्यासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दररोज 25 ते 30 रुग्ण येतात. त्यातील 10 ते 12 जण मानसिक आजाराला बळी पडलेले असतात. दर महिन्याला 1300 रुग्ण असे असतात ज्यांना मोबाईलशी संबंधित मानसिक व्याधी असतात. विशेष म्हणजे मुंबईच्या एकूण लोकसंख्येपैकी 10 टक्के लोकांना कधी ना कधी मोबाईल अॅडिक्शनमुळं मानसिक आजार होण्याची भीती आहे, असं केईएमच्या डीन डॉ. शुभांगी पारकर यांनी स्पष्ट केलं आहे.
फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम, हाईकसारख्या अॅप्ससोबतच वेगवेगळ्या गेम्समध्ये आणि फोटो काढण्यामध्ये मुलं इतकी गढून जातात, की त्यामुळे मणक्याचे विकार, मानेचे विकार, स्वमग्नता, संवाद कौशल्याचा अभाव, एकलकोंडेपणा, नैराश्यासोबतच अचानक वजन वाढणं, यासारख्या गंभीर आजारांना तोंड द्यावं लागतं. ज्यात 9 ते 20 वयोगटातील मुलामुलींचं प्रमाण लक्षणीय आहे.
गरज म्हणून पालक मुलांना मोबाईल देतात, पण गेम्सचं अॅडिक्शन आणि नेट सर्फिंगमुळे पैशांसकट वेळेचाही मोठा अपव्यय होतो. त्यामुळं पालक त्रस्त आहेत, असं शाळेतील शिक्षकांचं म्हणणं आहे.
सेल्फीमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ
2016 मध्ये फक्त सेल्फी काढताना अपघात होऊन 76 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरात ही संख्या 125च्य़ा घरात आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलणं, हेडफोन्सवर गाणी ऐकत रस्ता, ट्रॅक क्रॉस करताना होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही मोठं आहे. शिवाय रोज बाजारात येणारी नवनवी अॅप्स तरुणाईला आकर्षित करतात. यात रेपोसो, कँडी कॅमेरा, इन्स्टाग्राम आघाडीवर आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
भारत
भारत
Advertisement