भाजपा माजी जिल्हाध्यक्षाच्या कारने उडवलं, बुलेटस्वार अन् महिला जखमी; नागरिकांनी ड्रायव्हरला चोपले
अपघातात कारने धडक दिलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले असून घटनेनंतर तरुणांनी चालकास पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.

नांदेड : शहरात भरधाव वेगात असलेल्या एका फोर्ड एडेंवर चारचाकी कारने चार ते पाच वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना (Accident) घडली आहे. भाग्यनगर कॉर्नर ते यशवंत कॉलेज मार्गांवर मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. त्यात एक जण गंभीर जखमी असून इतर काहींना दुखापत झाल्याची माहिती आहे. कारचालक यशवंत हा दारुच्या नशेत असल्याचे दिसून आले असून ही कार भाजपचे (BJP) माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटेंची असल्याची माहिती समोर आली आहे. नांदेडमधील (Nanded) महाविद्यालय ते भाग्यनगर कॉर्नर रोडमार्गे भरधाव वेगाने जातं असताना कारने सुरुवातीला बुलेटला उडवले. त्यानंतर अन्य एक दुचाकी, एक कार आणि दोन ऑटो रिक्षाला देखील उडवले होते, पुढे दुभाजकावर जाऊन कार आदळली.
नांदेडमधील विचित्र अपघातातील कारचालक हा मद्यधुंद अवस्थेत होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. या अपघातात कारने धडक दिलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले असून घटनेनंतर तरुणांनी चालकास पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या घटनेनंतर वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. नांदेडमध्ये एका मद्यधुंद कार चालकाने रस्त्यावरून जाणाऱ्या एका बुलेटला आणि पायी चालणाऱ्या महिलेला उडवत रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या दोन ऑटो आणि एका कारला धडक दिली. त्यानंतर ही गाडी टी पॉईंटवर असणाऱ्या विद्युत खांबाला जाऊन धडकली. गाडीचा चालक पळत असताना त्याला नागरिकांनी पकडले, मद्यधुंद अवस्थेत दिसल्याने चालकाला नागरिकांनी बेदम चोप दिला. दरम्यान, MH 22 AM 5 या क्रमांकाची फोर्ड इंडेव्हर ही गाडी परभणीचे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे यांची असल्याचे सांगण्यात आले. नांदेडला ती गाडी सर्व्हिसिंगसाठी पाठवण्यात आली होती, गाडीचालक आदिनाथ शिंदे याने मद्यधुंद अवस्थेत हा अपघात केला आहे.
दरम्यान, इंडेवर कार विद्युत खांबाला धडकून थांबल्यानंतर त्यातील चालक पळत होता, पण नागरिकांनी त्याला पकडले. चालक दारूच्या नशेत असल्याचे लक्षात येताच त्याला बेदम चोप देखील दिला. त्यानंतर घटनानास्थळी पोलीस दाखल झाले आणि चालकाला त्यांनी ताब्यात घेतले. या घटनेत बुलेटस्वार आणि एक ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
हेही वाचा
पुण्यात एक-दोन नाही, तर 3 बिबट्या; एका मागून एकाचा मुक्त संचार, सीसीटीव्हीत घटना कैद

























