एक्स्प्लोर

मोबाईलवर जास्त वेळ घालवताय? ‘या’ आजाराचा धोका

स्मार्टफोन्सची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आजचा तरुण फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम यापैकी कमीत कमी एका अॅपच्या आहारी गेलेला असतो.

मुंबई : मोबाईलचा वापर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पण तुम्ही जर जास्त प्रमाणात स्मार्टफोनचा वापर करत असाल, तर तुम्हाला अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डर (एडीएचडी) होण्याचा धोका तयार होऊ शकतो. ‘जामा’ नावाच्या वृत्तपत्रात याबाबत एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. ‘सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करणाऱ्यांमध्ये एडीएचडीची लक्षणं 10 टक्के जास्त आढळून येतात. मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये हा डिसऑर्डर होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसंच किशोर वयातील अशी मुलं ज्यांना याआधी कधीतरी नैराश्य आलं आहे, त्यांना हा आजार होण्याचा धोका उद्भवतो,’ असं ‘जामा’च्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. या डिसऑर्डरमुळे काय होऊ शकतं? अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डरमुळे व्यसन करण्याची इच्छा होणे, जोखीम असणाऱ्या गोष्टी करण्याची इच्छा होणे यासारखे परिणाम होऊ शकतात. या डिसऑर्डरमुळे मुलांचा शाळेतील परफॉरमन्सही खराब होऊ शकतो. ‘स्मार्टफोन्सची लोकप्रियता प्रचंड प्रमाणात वाढत आहे. आजचा तरुण फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम यापैकी कमीत कमी एका अॅपच्या आहारी गेलेला असतो. यामुळे निद्रानाश किंवा कमी झोप यासारख्या समस्या तयार होतात. झोपण्याआधी लोक सर्वसाधारणपणे अर्धा ते एक तास सोशल मीडियावर घालवतात,’ असं हार्ट केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल सांगतात. डिसऑर्डरची लक्षणं लक्ष न लागणे, अतिसक्रियता, अचानक काहीतरी करणे अशी अटेंशन डेफिसिट हायपरअॅक्टिव्हिटी डिसऑर्डरची लक्षणं पाहायला मिळतात, अशी माहिती डॉ. अग्रवाल यांनी दिली. काय काळजी घ्याल? झोपण्याआधी अर्धा तास कोणत्याही इलेक्ट्रॉनिक गॅजेटचा वापर न करणे, आठवड्यातील एक दिवस सोशल मीडियाचा वापर न करणे, संगणकाचा दिवसातून तीन तासांपेक्षा जास्त वापर न करणे, अशी काळजी घेतल्यास हा डिसऑर्डर टाळता येईल, असं हार्ट केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांनी सांगितलं.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त

व्हिडीओ

Prashant Ambi on Sanjay Gaikwad : संजय गायकवाडांचे कार्यकर्ते फोनवर मला आई-बहिणी वरून शिव्या देतात
Laxman Hake PC : जरांगे नावाच्या एका अनपढ माणसामुळे ओबीसीचं आरक्षण संपलं, हाके आक्रमक
Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Playoffs : आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ ठरले, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार? संपूर्ण वेळापत्रक
आयपीएल प्लेऑफसाठी चार संघ निश्चित, पहिल्या दोन लढती फिक्स, बंगळुरु-गुजरात, हैदराबाद- राजस्थान कधी आमने सामने येणार?
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
अभिनेता म्हणून हा माणूस चांगला, पण माणूस म्हणून किती खालच्या पातळीचा; विजय पाटकरांवर राजेभोसलेंचा पलटवार
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
बीडमध्ये राजकीय नेत्याच्या मुलाकडून महिलेवर अत्याचार, पैसेही उकळले; विवाहितेची पोलिसात धाव, गुन्हा दाखल
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
विजेचा खांब पडून एकाचा मृत्यू; घरावरील उघड्या वायरचा करंट बसून चिमुकलाही ठार; दोन दुर्घटनेनंतर नागरिक संतप्त
Ladki Bahin Yojana :शासनानं राबवलेल्या लाडकी बहीण योजनेमुळं खूप ताण पडलाय, वेगवेगळ्या ठिकाणी जितकं फंडिंग यायला पाहिजे तितकं येत नाही : उदयनराजे भोसले
लाडकी बहीण योजना शासनानं राबवली त्याच्यामुळं खूप ताण पडलाय, उदयनराजे भोसले यांचं मोठं वक्तव्य
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
आता, कला क्षेत्रातही बिनविरोध निवडणुकांची प्रवृत्ती घुसतेय, हे घातक; यशोमती ठाकूरांचे कलाकारांना आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मे 2026 | रविवार
LIC : मार्च तिमाहीत एलआयसीची धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
LIC ची मार्च तिमाहीत धमाकेदार कामगिरी, नफ्याच्या बाबतीत SBI, HDFC सारख्या दिग्गज कंपन्यांना मागं टाकलं
Embed widget