SmartPhone Tips : सध्या लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्ती स्मार्टफोनचा वापर करतात. शाळेतील आणि कॉलेजमधील मुलं लॉकडाऊनच्या काळात स्मार्टफोनवरून शिक्षण घेत होते. तसेच वेगवेगळे अॅप्स अनेक जण मोबाईलमध्ये डाऊनलोड करतात. व्हिडीओ आणि फोटो देखील तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करत असाल. मोबाईलमध्ये डेटा जास्त झाल्याने अनेक वेळा माबाईल हॅंग होतो. तसेच जर मोबाईल बरीच वर्ष वापरला तरी देखील त्या फोनचा स्पिड कमी होतो. जाणून घ्या सोपी ट्रिक ज्यामुळे तुमचा मोबाईल हॅंग होणार नाही आणि फोनचा स्पिड देखील वाढेल.
ट्राय करा ही ट्रिक
मोबाईलमधील नको असलेले अॅप्स आणि फाइल्स डिलीट केल्याने तुमचा फोन हॅंग होणार नाही. फोन हॅंग होत असेल तर बॅकराऊंडमध्ये सुरू असलेले सर्व अॅप्स बंद करा. फोनचा स्पिड कमी झाला असेल तर फोन रिस्टार्ट करून थोडावेळ चार्जिंगला लावावा. फोन हॅंग होण्याचे कारण फोनमध्ये असणाऱ्या रॅम आहे. फोनमध्ये रॅम कमी असेल तर फोन हॅंग होतो. कमी किंमतीच्या फोनमध्ये रॅम कमी असतो. त्यामुळे रॅम जास्त असणारा फोन खरेदी करा.
WhatsApp New Features: आता व्हॉट्सअॅप वेबमध्ये मिळणार मोबाईल अॅपचे फिचर्स; काम होणार सोपे
मोबाईल का गरम होतो? हे उपाय करा
चार्जिंग करत असताना मोबाईल गरम झाल्यास थोड्या वेळासाठी चार्जिंग बंद करणं मोबाईलसाठी फायद्याचं ठरतं. मात्र, चार्जिंग कॉडच खराब असेल तर कॉड बदलल्याशिवाय उपाय नाही.मोबाईल वारंवार गरम होत असल्यास मोबाईल कंपनीकडे तक्रार करायला हवी. शिवाय, सर्व्हिस सेंटरमध्ये मोबाईल दाखवायला हवा. ज्यामुळे मोबाईलच्या सुरक्षेबाबत तुम्ही निश्चिंत राहू शकता.सर्वात महत्वाचं म्हणजे मोबाईल चार्जिंगला लावल्यानंतर फोनवर बोलू नये तसेच मोबाईलचा वापर देखील चार्जिंग सुरु असताना करणं धोकादायक ठरु शकतं.
WhatsApp Update : व्हॉट्सअॅपचे नवे फिचर, आता चॅटिंग करणं होईल अजून सोपं!