WhatsApp New Features: इन्टंट मेसेजिंग अॅप WhatsApp च्या नव्या फिचर्सची वाट यूजर्स उत्सुकतेने पाहात असतात. व्हॉट्सअॅप वेबमचा वापर अनेक लोक करत असतात. लॅपटॉपवर काम करणारे लोक व्हॉट्सअॅप वेबचा वापर जास्त करत असतात. व्हॉट्सअॅप वेबमध्ये मोबाईलमध्ये असणारे काही फिचर्स नाहित. त्यामुळे अनेक यूजर्स कंपनीकडे मोबाईल अॅपमधील फिचर्स व्हॉट्सअॅप वेबममध्ये द्यावेत अशी मागणी करत होते. आता लवकरच व्हॉट्सअॅप कंपनी व्हॉट्सअॅप वेबमध्ये प्रायव्हसी फिचर अॅड करणार आहेत.
प्रायव्हसी फिचर होईल अपडेट
WhatsApp च्या सर्व अपडेट्सकडे लक्ष देणारे WABetaInfo यांच्या मते, कंपनी व्हॉट्सअॅप वेबच्या एका बीटा व्हर्जनची टेस्टींग करत होते. या फिचरमध्ये प्रायव्हसी फिचर मिळणार आहे. रिपोर्टनुसार कंपनी व्हॉट्सअॅपवेबमध्ये मोबाईल अॅपचे लास्ट सिन (Last Seen), प्रोफाइल फोटो (Profile Photo), इन्फो About Info आणि Read Receipts हे फिचर्स अॅड करणार आहेत.
हे फिचर्स देखील मिळतील
व्हॉट्सअॅप वेबममध्ये Blocked Contacts ला देखील मेसेज करण्याची सुविधा मिळणार आहे. हे फिचर अजून टेस्टिंग फेजमध्ये आहे.
Apple iPhone 13 Pro Max : आयफोनचा असाही वापर! डोळ्यांवर उपचारासाठी होतेय मदत
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपच्या नव्या फिचरवर काम सुरू आहे. या फिचरमुळे यूजर्स जास्तीत जास्त व्हॉट्सअॅप अकाउंट ओपन करू शकतात. आत्ताच्या अॅपमध्ये यूजर चार डिव्हाइजमध्ये एक अकाउंट चालवू शकतात. पण मल्टी डिव्हाइज हे फिचर फक्त बीटा युजर्ससाठीच उपलब्ध आहे. आता कंपनी हे फिचर सर्व यूजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे आता चॅटिंग करणे सोपे होणार आहे.
WaBetaInfo च्या रिपोर्टनुसार जेव्हा यूजर मेन डिव्हाइजमध्ये व्हॉट्सअॅप सुरू करेल तेव्हा चॅट हिस्ट्रीला Sync करेल आणि जेव्हा दुसऱ्या डिव्हाइजवर अकाउंट लिंक केले जाईल तेव्हा अॅप सर्वरमधून मेसेज डाऊनलोड करून घेईल. खास गोष्ट ही आहे की जर मुख्य डिव्हाइजचे इंटरनेट कनेक्शन बंद राहिले तर दुसऱ्या डिव्हाइजमध्ये व्हॉट्सअॅप चालेल.
WhatsApp Update : व्हॉट्सअॅपचे नवे फिचर, आता चॅटिंग करणं होईल अजून सोपं!