मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपने व्हॉइजच्या नव्या फिचर्स अपडेटबद्दल माहिती दिली होती. या फिचरमध्ये युजर आपले व्हॉइज मेसेज तिन वेगवेगळ्या स्पिडमध्ये ऐकू शकतो. तसेच कंपनी आता फिचरमध्ये एक अपडेट घेऊन येत आहे. त्याचे नाव ग्लॉबल व्हॉइज मेसेजर प्लेयर फिचर असे आहे. हे फिचर अजून टेस्टींग फेजमध्ये आहे. काही दिवसानंतर यूजरसाठी रोलआऊट करण्यात येईल. चला जाणून घेऊयात या फिचरमध्ये काय खास आहे. 


व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेटकडे लक्ष देणारे WABetaInfo च्या रिपोर्टनुसार या ग्लोबल व्हॉइज फिचरच्या मदतीने  युजर्स आलेल्या व्हॉइज मेसेजला चॅट व्हिंडोच्या बाहेर येऊन देखील ऐकू शकतात. आत्तापर्यंत असे होते की जर तुम्ही कोणत्या चॅटमध्ये व्हॉइजमेसेज ऐकत असाल आणि जर तुम्ही ऐकताना चॅटच्या बाहेर गेला की तो व्हॉइज मेसेज आपोआप बंद होऊत जात होता. पण आता या नव्या फिचरमुळे तसे होणार नाही.  


करू शकता प्ले आणि डिसमीस
ग्लोबल व्हॉइज मेसेज प्लेअर फिचर मध्ये व्हॉट्सअ‍ॅपपवर सर्वांत वर असेल. त्यामुळे युजरला हे फिचर लगेच दिसेल.  रिपोर्टनुसार या फिचरमुळे युजर मेसेजला कधीही प्ले किंवा कधीही डिसमीस करू शकतात.  


Apple iPhone 13 Pro Max : आयफोनचा असाही वापर! डोळ्यांवर उपचारासाठी होतेय मदत


व्हॉट्सअ‍ॅप त्यांच्या युजरसाठी नवे मल्टी-डिव्हाइज सपोर्ट फिचर घेऊन येणार आहे. हे फिचर टेस्टिंग फेजमध्ये आहे. 


व्हॉट्सअ‍ॅपच्या अपडेटकडे लक्ष देणारे WABetaInfo च्या रिपोर्टनुसार व्हॉट्सअ‍ॅपच्या नव्या फिचरवर काम सुरू आहे. या फिचरमुळे युजर्स जास्तीत जास्त व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट ओपन करू शकतात. आत्ताच्या अ‍ॅपमध्ये चार डिव्हाइजमध्ये एक अकाउंट चालवू शकतात. पण मल्टी डिव्हाइज या फिचर हे फक्त बीटा युजर्ससाठीच उपलब्ध आहे. आता ते सर्व  युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे आता चॅटिंग करणे सोपे होणार आहे. 


Facebook, Instagram, WhatsApp 6 तासांनी सुरु; पण अद्याप तक्रारी कायम


WaBetaInfo च्या रिपोर्टनुसार जेव्हा युजर  मेन डिव्हाइजमध्ये  व्हॉट्सअ‍ॅप सुरू करेल तेव्हा चॅट हिस्ट्रीला Sync करेल  आणि जेव्हा दुसऱ्या डिव्हाइजवर अकाउंट लिंक केले जाईल तेव्हा अॅप सर्वरमधून मेसेज डाऊनलोड करून घेईल. खास गोष्ट ही आहे की जर मुख्य डिव्हाइजचे इंटरनेट कनेक्शन बंद राहिले तर दुसऱ्या डिव्हाइजमध्ये  व्हॉट्सअ‍ॅप चालेल.