भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी अनेक कंपन्या सरसावल्या आहेत. काही कार कंपन्यांनी त्यादृष्टीने पावले उचलत असून इलेक्ट्रिक कार लाँचिंगसाठी प्रयत्न करत आहेत. Hyundaiने देखील आपली इलेक्ट्रिक कार आणण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सुरू आहे. Hyundai ने आपल्या भारतातील मुख्यालयात  Ioniq 5 EV ही इलेक्ट्रिक कार प्रदर्शनास ठेवली होती. मात्र, कंपनीने त्याच्या लाँचिंगबाबत कोणतेही भाष्य केले नाही.  Ioniq 5 EV ही एसयूएव्ही कार असून BEV प्लॅटफॉर्मवर कार तयार करण्यात आली आहे. 


 Ioniq 5 EV या कारमधील आतील भाग अधिक प्रशस्त असल्याचे दिसून येते. डिझाइनच्या बाबतीत  Ioniq 5 EV ही कार अधिक आकर्षक आहे. चौकोनी आकाराचे टेल-लॅम्प, समोरील बंपरवरील अथवा चाकांवरील कट्समुळे कार आकर्षक दिसत आहे. 


कारचा अंतर्गत भागही आकर्षक आहे. मुव्हेबल सेंटर कन्सोल,  फ्लॅट फ्लोअर, इलेक्ट्रॉनिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स आणि ईको-बेस्ड मटेरिअल डिझाइनचा वापर करण्यात आला आहे. त्याशिवाय, 12 इंचाचा टचस्क्रिन आणि चालकासाठी 12 इंचाचा डिस्प्लेही देण्यात आला आहे. 


जगभरात Ioniq 5 ही कार 58 kWh अथवा 72.6 kWh मोटरसह उपलब्ध आहे. Ioniq 5 ही कार टेस्ला मॉडेलच्या Y  आणि इतर इलेक्ट्रिक कारसोबत स्पर्धा करणार आहे. जागतिक बाजारपेठेत या कारची किंमत ३७ लाखांपासून सुरू होते. 


सध्या जगभरात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. आयात शुल्क माफ झाल्यास भारतीय बाजारपेठेत या कार उपलब्ध होऊ शकतील. इलेक्ट्रिक कारची किंमत अधिक असली तरी त्याची डिझाइन, श्रेणीदेखील चांगल्या दर्जाची आहे. या कारचा समावेश Hyundai  Kona EV च्या वरील श्रेणीत होऊ शकतो. आता Hyundai  आपली  Ioniq 5 EV भारतात लाँच करणार की नाही याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 


संबंधित वृत्त: 


New Electric car launching in India भारतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत 'या' कंपनीची एन्ट्री


Car loan Information:

Calculate Car Loan EMI