एक्स्प्लोर

फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डे' सेल, आयफोनसह अनेक स्मार्टफोनवर बंपर सूट

मुंबई : फ्लिपकार्टच्या 'बिग बिलियन डे' सेलला आजपासून सुरुवात झाली आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणाऱ्या या सेलमध्ये स्मार्टफोन, टॅब्लेट, लॅपटॉप, स्मार्टवॉच इत्यादी डिव्हाईसवर बंपर डिस्काऊंट मिळणार आहे. शिवाय, एक्सचेंज ऑफरचा पर्यायही दिला जाणार आहे. 6 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे केवळ चार दिवसच सेल सुरु राहील. कोणत्या स्मार्टफोनवर ऑफर? फ्लिपकार्टच्या 'बिग बिलियन' सेलमध्ये आसूस जेनफोन 2, लेईको ले 2, लेईको ले 1s ईको, मोटो  X प्ले या स्मार्टफोनवर मोठी सवलत दिली जाणार आहे. आसूसच्या स्मार्टफोनवर 10 हजार रुपयांची सूट, म्हणजेच आसूस जेनफोन 2 स्मार्टफोन तुम्ही जवळपास 9 हजार 999 रुपयांना खरेदी करता येईल. Le 2 स्मार्टफोन या सेलमध्ये 10 हजार 499 रुपयांना मिळेल. 11 हजार 999 रुपये एवढी या स्मार्टफोनची मूळ किंमत आहे. Le 1s ईकोवर 2 हजार रुपयांची सूट दिली जात असून, 7 हाजर 999 रुपयांना हा स्मार्टफोन उपलब्ध असेल. याशिवाय, फ्लिपकार्टवर काही स्मार्टफोनवर एक्सचेंज ऑफरही दिली आहे. मोटो X प्लेवर 4 हजार 500 रुपयांचं डिस्काऊंट जाहीर करण्यात आले आहे. अॅपल वॉच फ्लिपकार्ट बिग बिलियन सेलमध्ये अॅपल वॉचवर मोठी सूट देण्यात आली आहे. अॅपल वॉचचं 42mm सपोर्ट एडिशन 19 हजार 990 रुपयांना उपलब्ध करुन देण्यात आले आहे. याची मूळ किंमत 29 हजार 990 रुपये आहे. म्हणजेच 10 हजार रुपयांची बंपर सूट दिली जात आहे. या अॅपल वॉचचे अनेक व्हेरिएंटही आहेत. मायक्रोमॅक्स एलईडी टीव्ही या सेलमध्ये भारतीय कंपनी मायक्रोमॅक्सचा 40 इंचाचा एलईडी स्मार्ट टीव्ही 25 हजार 990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. या टीव्हीची बाजारातील किंमत 39 हजार 9990 रुपये आहे. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसची प्री-बुकिंग फ्लिपकार्टवर सुरु झाली आहे. जर तुम्ही फ्लिपकार्टवरुन बुक करत असाल, तर सिटी बँकेच्या यूझर्सना 10 हजार रुपयांची कॅशबॅक ऑफर मिळेल. शिवाय, फोनसोबत 24 हजार 500 रुपयांपर्यंतचं एक्सचेंज ऑफरही मिळेल. गूगल क्रोमकास्ट 2 सेलमध्ये गूगल क्रोमकास्ट 2 वर चांगली सूट असून, 2 हजार 999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. बाजारात याची किंमत साधारणत: 3 हजार 999 रुपये आहे. गूगल क्रोमकास्ट एक मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाईस असून, याच्या मदतीने तुम्ही टीव्ही सेटवर स्मार्टफोन आणि लॅपटॉपवरुन कंटेट कनेक्ट करुन चालवू शकता.

महत्त्वाच्या बातम्या

देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
देशद्रोही म्हणता ना? मोदीजी तुम्हाला चॅलेंज देऊन 24 तास झालेत, डिबेटसाठी जागा ठरवा; हवं तर मोहन भागवतांना न्यायाधीश म्हणून घ्या, दूध का दूध, पानी का पानी होऊन जाऊदे, राहुल गांधींचं पुन्हा चॅलेंज
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
'टँगो' ॲपवर ओळख, नेपाळमधील महिलांनी बनवले व्हिडिओ; बीडमधील उच्चशिक्षित व्यापाऱ्यास 47 लाखांना लुटले
Sanjay Raut: अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
अमित शाह तुम्ही लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे काढताय आणि तुमच्याच सहकार मंत्रालयात, नियम कायदे धाब्यावर बसवून लोकशाहीची हत्या सुरुय, गोकुळला काय सुरुय? संजय राऊतांचा सडकून प्रहार
Satej Patil on Gokul: स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
स्थानिक स्वराज्य संस्था मतदानाने, लोकांच्या बहुमताने चालल्या पाहिजेत, पण मोडून काढणार असतील तर कितपत योग्य? सतेज पाटलांची विचारणा
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
सात दिवसात पैसे चौपट? गुंतवणुकीचे आमिष दाखवून वृद्धाची तब्बल 2 कोटींची फसवणूक; ED चा धाक दाखवून 1 करोड लुटले
Cyclone Murasu: मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
मुरासू चक्रीवादळाचे केंद्र आंध्र प्रदेशातून तेलंगणात सरकलं, 12 तासांसाठी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा; हजारो झाडे आणि विजेचे खांब कोसळले, 30 विमान उड्डाणे रद्द
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
आधी विधानपरिषद, आता जिल्हा बँकेच्या निकालानंतर वादावादी; जयकुमार गोरे म्हणाले, महायुतीचा धर्म पाळला नाही
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
Embed widget