एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपचे मेसेज अनसेंड करता येणार, 'रिकॉल' फीचर रोलआउट

या फीचरमुळे एकदा सेंड केलेला मेसेज अनसेंड करता येणार आहे. ‘व्हॉट्सअॅप बिटा इन्फोने' हे फीचर रोलआउट झाल्याची माहिती दिली आहे.

मुंबई : व्हॉट्सअॅपवर अनेकदा आपण एखादा मेसेज, फोटो किंवा व्हीडिओ नजरचुकीनं दुसऱ्याच व्यक्तीला किंवा ग्रुपमध्ये सेंड करतो. अशावेळी आपली बरीच गोची होते. त्यामुळे अशी चूक घडल्यानंतर मेसेज डिलीट किंवा अनसेंड करण्याचं एखादं फीचर असावं अशी मागणी अनेक यूजर्सनं व्हॉट्सअॅपनं केली होती. व्हॉट्सअॅप देखील या फीचरवर गेले अनेक दिवस काम करत होतं. अखेर कालपासून व्हॉट्सअॅपनं 'रिकॉल' हे फीचर रोलआउट करणं सुरु केलं आहे. या फीचरमुळे एकदा सेंड केलेला मेसेज अनसेंड करता येणार आहे. ‘व्हॉट्सअॅप बिटा इन्फोने' हे फीचर रोलआउट झाल्याची माहिती दिली आहे. हे फीचर अँड्रॉईड, आयओएस, विंडोज या सर्व प्लॅटफॉर्मवर रोलआऊट होणं सुरु झालं आहे. मात्र, यूजर्स तेच चॅट किवा मेसेज रिकॉल करु शकेल ज्यामध्ये दोन्ही बाजूकडील व्हॉट्सअॅप हे अपडेट झालेलं असेल. म्हणजेच, तुम्ही एखाद्या व्यक्तीला चुकून मेसेज सेंड केला पण तो तुम्हाला अनसेंड करायचा असल्यास तुमचं आणि त्या व्यक्तीचं व्हॉट्सअॅप अपडेट झालेलं असणं गरजेचं आहे. यूजर्स फक्त टेक्स्ट मेसेजच नाही तर GIF,फोटो, व्हॉईस मेसेज देखील अनसेंड करु शकतात. मेसेज पाठवल्यानंतर पुढच्या सात मिनिटात यूजर्सला मेसेज अनसेंड करता येईल. 7 मिनिटानंतर यूजर आपला मेसेज रिकॉल करु शकत नाही. पण समोरच्या व्यक्तीने तुमचा मेसेज लगेच वाचला तर मात्र युजरकडे मेसेज रिकॉल करण्याचा पर्याय नसेल.

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला

मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही

मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त

Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा

Embed widget