एक्स्प्लोर
Advertisement
नोटाबंदी, जिओच्या ऑफरमुळे दूरसंचार कंपन्यांची कमाई घटणार
नवी दिल्ली : रिलायन्स जिओची वेलकम ऑफर आणि नोटाबंदी या दोन्ही कारणांमुळे इतर दूरसंचार कंपन्यांच्या अडचणी वाढणार आहेत. तसेच येत्या दोन ते तीन महिन्यात त्यांची कमाई 7 टक्क्यांपर्यंत कमी होईल, असा अंदाज रेटिंग एजन्सी 'ड्रका'ने वर्तवला आहे.
वाढत्या स्पर्धेमुळे दूरसंचार कंपन्यांच्या कमाईवर अगोदरच परिणाम झाला आहे. त्यातच जिओने मोफत डेटा आणि व्हॉईस कॉलिंग सेवा वाढवल्यामुळे आणखीच परिणाम होईल, असं ड्रकाने म्हटलं आहे.
नोटाबंदीनंतर दूरसंचार कंपन्यांना आणखी फटका बसण्याची शक्यता आहे. विशेषतः या कंपन्यांच्या प्रीपडे सेवेवर परिणाम होईल, असं ड्रकाचे असोसिएट हेड हर्ष जगनानी यांनी म्हटलं आहे.
हर्ष जगनानी यांच्या म्हणण्यानुसार खाजगी दूरसंचार कंपन्या अगोदरच 4.25 लाख कोटी एवढ्या कर्जाच्या ओझ्याखाली आहेत. त्यातच जिओची मोफत सेवा त्यांच्या अडचणी आणखी वाढवणार आहे. कारण मोफत सेवेमुळे इतर ग्राहक जिओकडे वळून कमाई दूरसंचार कंपन्यांची कमाई घटणार आहे.
रिलायन्स जिओने 5 सप्टेंबर रोजी मोफत अनलिमिटेड व्हॉईस आणि 4 G डेटा कॉलिंगची सेवा सुरु केली होती. ही सेवा 31 डिसेंबरपर्यंत मिळणार होती. मात्र आता 'हॅप्पी न्यू इयर' या ऑफर अंतर्गत जिओच्या 5 कोटी सध्याच्या ग्राहकांना आणि नवीन ग्राहकांना 31 मार्चपर्यंत या मोफत ऑफरचा लाभ घेता येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सांगली
Advertisement