एक्स्प्लोर
कपिल शर्माच्या शोमध्ये काम करण्यावर कृष्णा अभिषेक म्हणतो...
नवी दिल्ली : कपिल शर्माकडून सुनील ग्रोवरला मारहाण झाल्यानंतर सुनील ग्रोवरनं कपिलच्या शोमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. याशिवाय कपिलच्या शोमधील इतर सहकलाकारांनीही कपिलवर बहिष्कार टाकला. त्यामुळे कपिलच्या शोच काय होणार, याबाबत विविध तर्क लढवले जात आहेत. पण कपिलच्या मदतीला त्याचे जुने मित्र कृष्णा अभिषेक आणि सुदेश लहरी धावून आले आहेत.
कपिलच्या शोमध्ये काम करण्यासंदर्भात कृष्णाने तयारी दाखवली असून, कपिलसोबत आपण कॉमेडी सर्कसमध्ये काम केल्याचं त्यानं सांगितलं आहे. तसेच आपण त्याला चांगल्याप्रकारे ओळखत असून, लहान-सहान गोष्टी वाढवून दाखवल्या जात असल्याचंही तो म्हणाला आहे.
त्याच्यासोबत काम करण्यासंदर्भात विचारले असता कृष्णा म्हणतो, सध्यातरी मी यावर काही बोलू शकत नाही. पण मी त्याचा चाहता आहे. तो अतिशय उत्तम कलाकार आहे, असंही कृष्णाचं म्हणणं आहे.
तर दुसरीकडे कृष्णाचा सहकारी सुदेश लहरीने कपिलनं जर बोलावलं, आणि चांगलं मानधन दिलं, तर नक्की त्याच्या शोमध्ये काम करेन, असं सांगितलं.
कपिल शर्माकडून सुनील ग्रोवरला विमानात मारहाण झाल्यापासून कपिलच्या शोमधील चंदन प्रभाकर, सुगंधा मिश्रा, अली असगर यांनीही कपिलवर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे कपिलचा शो अडचणीत सापडला होता. पण त्याच्या मदतीला कृष्णा अभेषक आणि सुदेश लहरी धावून आल्याने कपिल शर्माला दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.
संबंधित बातम्या
सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट
…म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement