नवी दिल्ली: जगभरातील कार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. ठराविक काळानंतर भारतात नव्या कारचे लॉन्चिंग होते. जर आपण नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर थोडंसं थांबा. कारण लवकरच भारतीय ऑटो बाजारात काही नव्या कार लॉन्च केल्या जाणार आहेत. मारुती सुझुकी पासून निसानपर्यंत आणि महिंद्रा पासून टाटापर्यंत या कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपल्या नव्या कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. भारतात लॉन्च होणाऱ्या या टॉप पाच कार कोणत्या आहेत त्याबद्दल आपण माहिती घेऊयात.


Maruti Suzuki XL5


मारुती XL5 ही वॅगनआर ची प्रीमियम मॉडेल असेल. या कारची विक्री मारुती सुझुकीच्या प्रीमियम डिलरशिप Nexa तर्फे करण्यात येणार आहे. वॅगनआरच्या तुलनेत XL5 चे इंटेरियर प्रीमियम असेल आणि त्यात काही अतिरिक्त फिचर्सदेखील असतील. या कारच्या लूकमध्येही काही बदल होण्याची शक्यता आहे.



Nissan Magnite


Nissan Magnite मध्ये सेगमेंट फर्स्ट 7.0 इंच टीएफटी इन्स्ट्रूमेंट कंसोल युनिट आहे जे की या रेंजच्या कारमध्ये अद्याप पहायला मिळत नाही. याचसोबत मॅग्नाइटमध्ये अॅन्ड्राइड ऑटो आणि अॅपल कार प्ले कनेक्टिव्हिटी सोबत 8 इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, अॅन्बियंट मूड लायटिंग, क्रूज कंट्रोल सोबत अनेक शानदार फिचर्स देण्यात आले आहेत. निसान कंपनीच्या या कारचे डॅशबोर्ड आकर्षक आहे. यात एसी वेन्ट्स, ग्लॉब बॉक्स आणि स्पीकर सोबत आणखी काही साधनांची प्लेंसिगदेखील आकर्षक आहे. या कारची सुरुवातीची किंमत ही 5,50,000 रुपये इतकी आहे. ही कार बाजारपेठेत पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे.



Mahindra TUV 300


Mahindra TUV 300 या कारच्या लॉन्चिंग तारखेची अद्याप अधिकृतरित्या घोषणा झाली नाही. परंतु सूत्रांच्या मते 2021 सालच्या पहिल्या तिमाहीत ही कार भारतीय बाजारपेठेत येण्याची शक्यता आहे. लीक डिटेल्सच्या माहितीनुसार कंपनी या कारच्या फ्रंट लूक मध्ये काही प्रमाणात बदल करण्याच्या तयारीत आहे. या कारचा ओव्हरऑल प्रोफाइल पहिल्यासारखाच आहे.



Maruti Suzuki Jimny


Maruti Suzuki ने या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या ऑटो एक्सपोमध्ये ऑफ-रोड एसयूव्ही Jimny चे प्रदर्शन केले होते. ही कार लवकरच भारतीय ऑटो बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे. मार्केटमध्ये याचे 5-डोअर मॉडेल लॉन्च करण्यात येणार आहे. मारुती कंपनीच्या या कार मध्ये 1.5-लीटर K-सीरीज पेट्रोल इंजिन असेल. या कारला लग्जरी कारच्या रुपात बाजारात लॉन्च करण्यात येणार आहे.



Tata HBX


टाटा मोटर्सदेखील भारतीय बाजारात आपल्या एन्ट्री-लेवल कॉम्पॅक्ट साईज SUV कारला लॉन्च करणार आहे. नुकतंच टेस्टिंग वेळी या कारचा फर्स्ट लूक पहायला मिळालं होतं. या कारचे नाव सध्यातरी Tata HBXअसं सांगण्यात येतंय परंतु याच्या प्रोडक्शन व्हर्जनचे नामकरण हॉर्नबिल असं केलं जाऊ शकतं. या कारच्या टेस्टिंग मॉडेलमध्ये 15 इंचाचा अलॉय व्हील देण्यात आला आहे ज्यावर फ्लेयर्ड व्हील आर्कची सुविधा आहे. सुरुवातीला ही कार डिसेंबर 2020 मध्ये लॉन्च होणार होती पण आता 2021 सालच्या मध्यापर्यंत याचे लॉन्चिंग होण्याची शक्यता आहे.



महत्वाच्या बातम्या: