मुंबई : निस्सान कंपनीला भारतात प्रभावी कामगिरी करायची आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या आगामी Nissan Magnite या उत्पादनात जे काही शक्य आहे ते सर्वकाही समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता Nissan Magnite हे आगामी उत्पादन या कार निर्मित कंपनीचे भविष्य निश्चित करणार आहे. सुदैवाने Magnite च्या प्रथमदर्शनी लूकमुळे यामध्ये तशी क्षमता असल्याचं दिसत आहे. सध्याच्या लाईन अप कॉम्पॅक्ट SUV शी स्पर्धा करण्यासाठी Magnite ही 4 मीटरपेक्षा कमी SUV या प्रकारात आहे.  स्पर्धा ही मोठी असून निस्सान कंपनी 1.0 पेट्रोल आणि इतर काही अपेक्षित बदलांसह वेगळी रणनीती आखत आहे. त्याचे लॉंचिंग अजून काही दिवस लांब असले तरी त्याच्या काही वैशिष्ट्यांवर आपण नजर टाकू.



प्रथमदर्शनी Magnite ही त्याच्या शार्प स्टायलिंग आणि आकारामुळे मोठी आणि अधिक रुंद दिसते. त्याचा ग्राऊंड क्लिअरन्स हा 205mm इतका असल्याने त्याला शोभून दिसतो. यामध्ये अधिक चमकदारपणा येण्यासाठी यात चार कोट्सचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे ही लाल रंगाची कार अधिक लक्षवेधक दिसते. मोठे आणि अरुंद हेडलॅम्प आणि L आकाराचे DRL हे चांगले दिसतात. त्याचे ग्रीलही मोठे आहेत आणि त्यावर निस्सानचा नवा लोगो लावला आहे. त्याचे अच्छादन, रुफ रेल्स आणि स्किप प्लेटही उच्चप्रतिचे आहे. त्याची 16 इंचाची चाके ही त्याला एका मोठ्या SUV चा लूक देतात. एकूणच ही कार लक्षवेधक आहे.



आतील भाग हा त्याच्या बाहेरील भागापेक्षा इतका आकर्षक नसला तरी आपले लक्ष वेधतो. डिजिटल डायलसह चांदीचं फिनिशिंग असणाऱ्या 8 इंच टच स्क्रीनची गुणवत्ता उच्च आहे. ते एका वेगळ्या वैशिष्ट्यांसह बनवण्यात आले आहेत. त्यावर आपण स्टेअरिंग नियंत्रित करु शकतो आणि इतर बरीच माहिती जसे टायरचे प्रेशर किती आहे हे मिळवू शकतो. टच स्क्रीनच्या खाली आपल्याला टॉगल स्विच आणि वातावरण नियंत्रण करणारी व्यवस्था मिळेल. त्या खाली चालू आणि बंद करायचे बटण आहे. टॉगल स्विच आणि राउंड नॉब हे उच्च गुणवत्तेचे आहेत. आत वापरण्यात आलेले प्लॅस्टिक हेही आकर्षक आहे.



यात टचस्क्रीनची सुविधा अत्यंत आधुनिक पद्धतीची आहे आणि आपल्याला त्यात स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मिळते. यात 360 कोनातून फिरणारा कॅमेरा, 6 ऑडिओ स्पीकर, वायरलेस चार्जर, एअर प्युरीफायर, टायर प्रेशर नियंत्रण व्यवस्था अशा अनेक सुविधा मिळतात. यात एक क्रूझ कंट्रोल आणि रियर एसी व्हेंट्स आहे. सनरुफची सुविधा यात देण्यात आली नाही. ही टेक वैशिष्ट्ये मीड व्हेरिएंट ग्राहकालाही मिळू शकतात. बुट स्पेस हा 3361 चा आहे आणि एक मोठा ग्लोव बॉक्स जो मोठ्या स्पेससह दिला आहे. यात जागेची उपलब्धता चांगली आहे आणि मागच्या बाजूलाही दोन प्रवासी आरामात बसू शकतात.



ही कार डिझेलच्या सुविधेसह उपलब्ध नाही. पेट्रोलच्या सुविधेसह दोन प्रकारात ही कार उपलब्ध आहे. एक जी 1.0 पेट्रोलची आहे ती मॅन्युअल प्रकारात आहे आणिस दुसरी जी आपण पाहतोय ती 1.0 टर्बो पेट्रोल आणि CVT अॅटोमॅटिक आहे. यात AMT ची सुविधा नाही पण 1.0 टर्बो मॅन्युअल प्रकारात ही उपलब्ध आहे. तसेच यात दोन एअर बॅग, हिल स्टार्ट, ट्रॅक्शन कंट्रोलची सुविधा देण्यात आली आहे.



प्रथम दर्शनी Magnite ही अनेक वैशिष्ट्यांसह उपलब्ध होत आहे आणि त्याचा कॉम्पॅक्ट SUV लूक आकर्षक आहे. किंमत जर चांगली असेल तर याची मागणी वाढू शकते. ती पुढच्या महिन्यात बाजारात आल्यानंतर त्याच्याबद्दल अधिक माहिती समजू शकेल.


Nissan Magnite


काय चांगलं आहे? - लूक, वैशिष्ट्ये, CVT automatic


काय चांगलं नाही? - इंटरिअर, डिझेल नाही