मुंबई : देशासह जगभरात अत्यंत वेगाने 5G कनेक्टिव्हिटीचा प्रसार होताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी भारतात अनेक स्मार्टफोन 5G टेक्नॉलॉजीच्या फिचरसोबत लॉन्च करण्यात आले आहेत. वनप्लसपासून सॅमसंगपर्यंत अनेक कंपन्या भारतात 5G नेटवर्कला सपोर्ट करणारे स्मार्टफोन लॉन्च करत आहेत. आज आम्हीही तुम्हाला काही अशा 5G केनेक्टिव्हिटीला सपोर्ट करणाऱ्या स्मार्टफोन्सबाबत सांगणार आहोत.
OnePlus Nord
वनप्लस अनेक 5G टेक्नॉलॉजी असणारे फोन सादर करत आहे. यामध्ये OnePlus Nord चाही समावेश होत आहे. या फोनमध्ये 6 GB+64GB असणाऱ्या व्हेरिएटची किंमत 24999 रुपयांपासून सुरु होत आहे. फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये अॅन्ड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. वनप्लसच्या या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचांचा फुल HD आणि Fluid AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
फाईल फोटो
OnePlus 8
वनप्लस चा OnePlus 8 आणि OnePlus 8 Pro देखील 5G कनेक्टिव्हिटी असणारे स्मार्टफोन आहे. वनप्लस 8 ची किंमत 41999 रुपयांपासून सुरु होते. तर वनप्लस 8T देखील 5G टेक्नॉलॉजी असणारं व्हेरिएंट आहे. याची किंमत 42999 रुपयांपासून सुरु होते.
Asus ROG
5G स्मार्टफोन्सच्या यादीत Asus ROG फोन 3 गेमिंग स्मार्टफोनचं नावाचाही सहभाग आहे. याचा 8GB रॅम आणि 128 GB स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत 46999 रूपये आहे. आसूसच्या या स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आलेली आहे. जी 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.
Motorola Edge+
Motorola चा स्मार्टफोनही 5G कनेक्टिविटीसोबत येतो. फोनमध्ये फुल HD OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. याचा 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 64999 रुपये आहे.
फाईल फोटो
iPhone 12 सीरीज
Apple iphone 12 सीरीजचे सर्व फोन 5G सपोर्टसोबत लॉन्च करण्यात आले आहेत. यामध्ये iPhone 12, iPhone 12 Mini, iPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max चा समावेश आहे. सर्व मॉडेल्सची स्क्रिन साइजही वेगवेगळी आहे. iPhone 12 मिनी (64GB)ची किंमत 69,900 रुपये, iPhone 12 Pro Max (128 GB) ची किंमत एक लाख 39 हजार 990 रूपये आहे. iPhone 12 (64 GB) ची किंमत 79 हजार 990 रूपये आहे.
महत्त्वाच्या बातम्या :