मुंबई : भारतात इंटरनेट प्लॅनच्या किमती कमी झाल्या आहेत. अशातच टेलीकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना बेस्ट प्लान देण्यात चढाओढ होत असल्याचं दिसत आहे. तसेच ग्राहकांनाही कंपन्यांकडून कमी किमतीत चांगल्या प्लॅन्स मिळण्याची शक्यता आहे. देशात सध्या तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जियो, एअरटेल आणि वोडाफोन यांच्यात ग्राहकांना स्वस्तात मस्त प्लान उपलब्ध करून देण्यासाठी चढाओढ दिसत आहे. जाणून घेऊया 199 रुपयांत कोणती कंपनी सर्वात उत्तम आणि अनेक सोयीसुविधा असलेला प्लान ग्राहकांना देत आहे.

Jio चा 199 रुपयांचा प्लान

199 रुपयांमध्ये रिलायन्स जियो युजर्सना प्रत्येक दिवशई 1.5GB डाटा देत आहे. त्याचसोबत जियो नेटवर्कवर अनलिमिटेड, नॉन जियो नेटवर्कवर कॉल करण्यासाठी 1000 मिनिट्स देण्यात येत आहेत. या प्लानमध्ये यूजर्सना 100 एसएमएस फ्री मिळणार आहेत. याव्यतिरिक्त कंपनी या प्लानमध्ये जियो अॅप्सचं फ्री सब्स्क्रीप्शन देत आहे. याची व्हॅलिडिटी 28 दिवसांसाठी आहे.

199 रुपयांमध्ये Airtel चा प्लान

एअरटेल 199 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 1 GB डाटा मिळणार आहे. याव्यतिरिक्त लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड देण्यात आले आहेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची FUP लिमिट नाही. जर तुम्ही हा प्लान घेतला, तर यामध्ये तुम्हाला दररोज 100 एसएसएस फ्री पाठवण्यात येतील. हा प्लान 24 दिवसांपर्यंत वॅलिड आहे.

199 रुपयांमध्ये Vodafone देत आहे हा प्लान

जियो आणि एअरटेल व्यतिरिक्त वोडाफोनच्या 199 रुपयांच्या प्लानमध्ये दररोज 1GB डाटा मिळत आहे. त्याचसोबत कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंगसाठी अनलिमिटेड मिनिट्स देण्यात येत आहेत. तसेच लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉल्स पूर्णपणे फअरी देण्यात आले आहेत. या प्लानमध्ये तुम्ही दररोज 100 एसएमएस फ्रीमध्ये पाठवू शकता. त्याचसोबत या पॅकमध्ये कंपनी वोडाफोन प्ले आणि ZEE5चं सब्सक्रिप्शन एक वर्षासाठी फ्री देत आहे.

महत्त्वाच्या बातम्या :