मुंबई : मोटोरोला वन फ्यूजन प्लस सध्या देशातील मोटोरोलाचा सर्वात लोकप्रिय फोन बनला आहे. हा फोन याआधीही अनेकदा सेलमध्ये विकण्यात आला आहे. परंतु, याफोनची क्रेझ एवढी आहे की, काही वेळातच हा फोन सेलमध्ये सोल्ड आऊट होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हा फोन सेलमध्ये विकण्यासाठी तयार आहे. आज दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर तुम्ही हा फोन खरेदी करू शकता. मोटोरोला वन फ्यूजन प्लस 16 जून रोजी भारतात लॉन्च करण्यात आला होता.


स्मार्टफोन युजर्समध्ये याची मागणी पाहता, कंपनीने या फोनच्या किंमतीत पाचशे रुपयांची वाढही केली आहे. आता हा मोबाईल 17 हजार 499 रुपयांना मिळणार आहे. तुम्हालाही हा फोन विकत घ्यायचा असेल, तर तुम्ही आज सेलमध्ये विकत घेऊ शकता.


असा खरेदी करा मोटोरोला वन प्लस फ्यूजन प्लस :




  • सर्वात आधी तुम्हाला फ्लिपकार्टच्या अॅप किंवा वेबसाइटवर लॉगइन किंवा रजिस्टर करावं लागेल.
    त्यानंतर मोटोरोला वन प्लस फ्यूजन प्लस सेल पेजवर जाऊन क्लिक करावं लागेल.
    त्यानंतर फोन अॅड प्रोडक्ट टू कार्टवर क्लिक करावं लागेल.
    तुम्हाला विचारण्यात आलेल्या शिपिंग डिटेल्स टाकाव्या लागतील.
    तुमची ऑर्डर पूर्ण होईल


मोटोरोला वन प्लस फ्यूजन प्लसचे स्पेसिफिकेशन्स :


कॅमेरा 


फोटोग्राफीसाठी फोनच्या रियरमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5 मेगापिक्लसचा मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त याच्या फ्रंटमध्ये 16 मेगापिक्सलचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.


डिस्प्ले आणि स्पेसिफिकेशन


Motorola One Fusion+ मध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. परफॉर्मंससाठी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 730 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन स्टॉक अँड्रॉईड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या स्मार्टफोनमध्ये गूगल असिस्टंटचं बटनही देण्यात आलं आहे. तसेच 5,000 mAh एवढी क्षमता असणारी बॅटरी देण्यात आली असून तिला 5 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 4G VoLTE, ब्लूटूथ वर्जन 5.0, व्हायफाय, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक, डुअल सिम आणि USB टाइप यांसारखे फिचर्स देण्यात आले आहेत. या फोनचं वजन 210 ग्रॅम आहे.


Honor 9X Pro सोबत थेट मुकाबला


Motorola One Fusion+ ची थेट स्पर्धा Honor 9X Pro सोबत होणार आहे. या फोनची किंमत 17 हजार 999 रुपये आहे. यामध्ये 6.59 इंचाचा फउल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं रिझॉल्यूशन 1,080x2,340 पिक्सल आहे. परफॉर्मन्ससाठी यामध्ये ऑक्टा-कोअर HiSilicon Kirin 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉईड 9 वर आधारित EMUI 9.1 ऑपरेटिंग सिस्टम वर काम करतं. फोटोग्राफीसाठी या फोनच्या रियरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 48 मेगापिक्सलचा सोनी IMX582 सेंसर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलचा डेप्श सेंसरचा समावेश आहे.