मुंबई : व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी Zoom अॅपला देशी पर्याय Relianceने उपलब्ध करून दिली आहे. रिलायन्स जिओने एक एचडी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप जियोमीट (JioMeet) आता नॉन जिओ युजर्ससाठीही ओपन केलं आहे. जिओमीट (JioMeet) अॅपच्या उपयोगासाठी युजर्सना कोणतंही सबस्क्रिप्शन किंवा प्लान घ्यावा लागणार नाही. हे अॅप मोफत वापरता येणार आहे.


जिओमीट (JioMeet) वर व्हिडीओ कॉन्फरसिंगसाठी आता कोणत्याही इनव्हाइट कोडची गरज भासणार नाही. 100 हून अधिक युजर्स एकाच वेळी जिओमीटमार्फत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जाऊ शकतात. जिओमीट जवळपास सर्वप्रकारच्या डिव्हाइसमध्ये काम करतं.


जिओमीट अॅप मीटिंग शेड्यूल, स्क्रिन शेअर यांसारख्या आकर्षक फिचर्सनी सज्ज आहे. कॉन्फरन्सिंग होस्टला म्युट अनम्युट यांसारखे अधिकारही या अॅपमध्ये देण्यात आले आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेक लोक वर्क फ्रॉम होम करतात. अशातच जिओमीट (JioMeet) एक उत्तम पर्याय आहे. त्यामुळे जिओमीट हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप बाजारात झूम अॅपला थेट टक्कर देणार आहे.


जिओमीट (JioMeet) ला गूगल प्लेस्टोअर किंवा अॅपल स्टोअरवरून डाउनलोड करता येऊ शकतं. येथे अॅन्ड्रॉइड आणि अॅपलवर सामान्य रुपात काम करतं. जियोमीट मायक्रोसॉफ्ट विंडोजला देखील सपोर्ट करतं. त्यामुळे युजर्स हे अॅप डेस्कटॉप किंवा लॅपटॉपवरही अगदी सहज डाऊनलोड करू शकतात.


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन यांमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. तसेच अनेक लोक घरांमध्ये बंद असल्यामुळे मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांना भेटणं होत नाही. अशातच लॉकडाऊनमध्ये व्हिडिओ कॉलिंगच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे व्हिडीओ कॉलिंगसाठी JioMeetच्या स्वरुपात युजर्सना एक पर्याय उपलब्ध झाला असून याद्वारे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या झूम अॅपला टक्कर मिळणार आहे.


असं कराल डाऊनलोड :


- मोबाइल युजर्स प्ले स्टोअर किंवा अ‍ॅप स्टोअरवर JioMeet सर्च करुन डाउनलोड करु शकतात.


- डेस्कटॉप युजर्स https://jiomeetpro.jio.com/home#download या वेबसाइटवर जाउन अॅप्लिकेशन डाउनलोड करु शकतात.


महत्त्वाच्या बातम्या : 


Avatars | फेसबुकचं नवं भन्नाट फिचर


इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी सेलिब्रिटी मालामाल, कोटींची कमाई, हे कलाकार अव्वल


टिकटॉकवर भारतात बॅन आल्यानंतर युजर्सची देशी App चिंगारीकडे धाव..