नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे बंद आहेत. अशातच अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्कफ्रॉम होम करण्यास सांगितले आहे. जर तुम्हीही घरून काम करत असाल तर आज आम्ही तुम्हाला जियो, वोडाफोन आणि एअरटेलचे काही लॉन्ग टर्म प्री-पेड प्लान्सबाबत सांगणार आहोत. कारण वर्क फ्रॉम होम करताना जास्त डाटा वापरावा लागतो. जाणून घेऊया या प्लान्सबाबत सविस्तर...

Jio रिचार्ज प्लान

Jio कडे 1.5 GB दररोज देणारा डाटा प्लान आहे. या प्लानची किंमत 2121 रुपये इतकी आहे. या प्लानमध्ये युजर्सना 336 दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. याव्यतिरिक्त यामध्ये दररोज 100SMS ची सुविधाही देण्यात येते. एवढचं नाहीतर Jio टू Jio नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि 12 हजार एफयूपी मिनिट्स मिळतात. ज्याच्या मदतीने नॉन Jio नेटवर्कवर कॉलिंग केली जाऊ शकते. या प्लानमध्ये Jio कडे अॅप्सचं सबस्क्रिप्शन फ्री मिळतात.

Airtel रिचार्ज प्लान

Airtelचा 1.5GB डाटा प्लानची किंमत 2398 रुपये आहे. हा एक लॉन्ग टर्म प्लान देणारा रिचार्ज आहे. म्हणजेच याची व्हॅलिडिटी 365 दिवसांसाठी आहे. यामध्ये दररोज 100 SMS ची सुविधाही युजर्ससाठी देण्यात आली आहे. या प्लानसोबत युजर्सना ZEE5 Premium आणि Wynk Music चं फ्री सबस्क्रिप्शन मिळतं. याव्यतिरिक्त या प्लानमध्ये युजर्सला ZEE5 Premium आणि Wynk Music यांचं सबस्क्रिप्शन देखील देण्यात येतं. ज्या व्यक्ती व्हिडीओ पाहणं पसंत करतात, त्यांच्यासाठी Airtel बेस्ट मानलं जातं.

Vodafone रिचार्ज प्लान

Vodafoneचे दररोज 1.5GB डाटा देणाऱ्या प्लानची किंमत 2399 रुपये आहे. हा एक लॉन्गटर्म प्लान आहे. ज्याची व्हॅलिडिटी 365 दिवसांची आहे. यामध्ये दररोज 100 SMSची सुविधा देण्यात आली आहे. यामध्ये युजर्सला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. या प्लानसोबत कंपनी Vodafone play आणि ZEE5 Premium चं सबस्क्रिप्शन मिळतं. या तिनही प्लान्सम्ये सर्वात स्वस्त प्लान Airtelचा आहे. यामध्ये फिचर्सही जास्त देण्यात येत आहेत. तसेचं संपूर्ण वर्षासाठी हा उत्तम पर्याय आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

रिलायन्स जिओचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अॅप लॉन्च, JioMeet ची गूगल मीट, झूमला टक्कर

Avatars | फेसबुकचं नवं भन्नाट फिचर

इन्स्टाग्रामवर एका पोस्टसाठी सेलिब्रिटी मालामाल, कोटींची कमाई, हे कलाकार अव्वल

टिकटॉकवर भारतात बॅन आल्यानंतर युजर्सची देशी App चिंगारीकडे धाव..