एक्स्प्लोर
अमेझॉनचा आणखी एक सेल, ग्राहकांना सुवर्णसंधी
या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळणार आहे.
मुंबई : दिवाळीआधी आपल्या ग्राहकांसाठी अमेझॉन पुन्हा ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल’ सेलचं आयोजन केलं आहे. जर मागील सेलमध्ये ग्राहकांची काही वस्तू खरेदी करण्याची संधी हुकली असेल तर आता यानिमित्तानं ती संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. हा सेल 4 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. दरम्यान आज मध्यरात्रीपासूनच हा सेल सुरु होणार आहे.
या सेलमध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि स्मार्टफोनसह अनेक वस्तूंवर भरघोस सूट मिळणार आहे. सॅमसंग, सोनी, एलजी, एचपी आणि अॅपल यासारख्या अनेक ब्रॅण्डवर शानदार ऑफर असणार आहेत.
अमेझॉनच्या मागील सेलमध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सर्वात जास्त विक्री झाली होती. त्यामुळे यावेळी देखील तसाच प्रतिसाद मिळण्याची आशा कंपनीला आहे. या सेलमध्ये अनेक वस्तूंवर कॅशबॅक ऑफरही असणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement