एक्स्प्लोर
'हा' तुमचा पासवर्ड आहे का? सर्वाधिक वापरलेले 25 पासवर्ड

मुंबई : इंटरनेटचा वापर गेल्या काही वर्षांपासून प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे इंटरनेटवरील अनेक गोष्टींसाठी पासवर्डची सुविधा दिली जाते. इमेल असो वा सोशल मीडिया अकाऊंट असो... पासवर्डमुळे यूझर्सची वैयक्तिक माहिती सुरक्षित राहते. त्यासाठी अनेक पोर्टल यूझर्सना अधिक सुरक्षित पासवर्ड ठेवण्याचं सुचवतात. मात्र, एका संशोधनातून पासवर्डसंबंधी अत्यंत रंजक माहिती समोर आली आहे. 'कीपर्स सिक्युरिटी' नावाच्या संस्थेने पासवर्डसंदर्भात एक संशोधन केलं. या संशोधनातून असं समोर आले की, 2016 या वर्षात '123456' आणि '123456789' या दोन पासवर्डना सर्वाधिक यूझर्सनी पसंती दिली.
संबंधित बातमी : पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या सोप्या टिप्स
इंटरनेट जगतातील जवळपास 10 लाख 70 हजार यूझर्सनी 2016 या वर्षात '123456' या पासवर्डला पसंती दिली. धक्कादायक म्हणजे, याच संशोधनातून असेही समोर आले आहे की, जगभरातील 1 कोटी अकाऊंट्सपैकी 17 टक्के अकाऊंट 2016 या वर्षात हॅक झाले होते. 2016 या वर्षात सर्वात जास्त 'या' पासवर्डना पसंती :- 123456
- 123456789
- Qwerty
- 12345678
- 111111
- 1234567890
- 1234567
- Password
- 123123
- 987654321
- Qwertyuiop
- Mynoob
- 123321
- 666666
- 18atcskd2w
- 7777777
- 1q2w3e4r
- 654321
- 555555
- 3rjs1la7qe
- 1q2w3e4r5t
- 123qwe
- Zxcvbnm
- 1q2w3e
संबंधित बातमी : पासवर्ड सुरक्षित ठेवण्याच्या सोप्या टिप्स
Before You Go
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण





















